6 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

भाजप नेत्यांना माथेफिरू आणि केंद्रीय मंत्री यातला फरक कळतो? | राणेंच्या बचावासाठी पवारांसंबंधित अजब उदाहरण

Narayan Rane

मुंबई, २५ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

भाजप नेत्यांना माथेफिरू आणि केंद्रीय मंत्री यातला फरक कळतो?, राणेंच्या बचावासाठी पवारांसंबंधित अजब उदाहरण – BJP MLA Ashish Shelar gave example of attack on Sharad Pawar to defend union minister Narayan Rane :

या सगळ्या प्रकारामध्ये अंतिमत: आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होते. कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असा निवाडा ते घोषित करत होते. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तिने लगावली होती. तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तिला माफ केलं. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुनही शिवसेनेला ते कळत नाही?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेनेवर हल्ला चढवला. यावेळी शेलार यांनी थेट पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखलाच दिला. शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली. त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, अशी टीका शेलार यांनी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Ashish Shelar gave example of attack on Sharad Pawar to defend union minister Narayan Rane.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x