6 May 2024 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षिस | विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक

Vishwa Hindu Sena Arun Pathak

बनारस, २६ ऑगस्ट | विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बनारसच्या भेलूपूर भागात राहणाऱ्या अरुण पाठक यांनी फेसबुक आणि ट्विटरवर नारायण राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह पोस्टही केल्या आहेत.

नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षिस, विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक – Vishwa Hindu Sena president Arun Pathak announced 51 lakhs reward for beheading Narayan Rane :

कोण आहेत अरुण पाठक?
अरुण पाठक हे पहिले शिवसैनिक होते. महाराष्ट्रात काँग्रेसशी युती केल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि विश्व हिंदू सेना स्थापन केली. यापूर्वी अरुण पाठक प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा एका नेपाळी तरुणाचे गंगेच्या काठावर मुंडन केले होते. त्याला जय श्री राम अशी घोषणा द्यायला लावल्या होत्या. शिवाय, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी अरुण पाठकचे मुख्य आरोपी म्हणून नाव नोंदवले आणि गुन्हा दाखल केला होता. सध्याही पोलीस तीन प्रकरणांमध्ये अरुण पाठकचा शोध घेत आहेत.

नारायण राणे कृतघ्न, पॉकेटमार:
अरुण पाठकअरुण पाठक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले आहे, की “पॉकेटमार आणि ब्लॅकने तिकीट विकणाऱ्या नारायण राणेला बाळासाहेबांनी दयाळूपणे शिवसैनिक बनवले. त्याला मुख्यमंत्रीही बनवले. मात्र त्यानेच एक घृणास्पद काम केले आहे. स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या मुलावर त्याने हल्ला केला. त्यामुळे अशा माणसाचे डोके कापले पाहिजे. जो हे काम करेल, त्याला 51 लाख रुपये बक्षिस देईन”

यासोबतच अरुण पाठक यांनी ट्विटर अकाऊंटवरही राणेंसंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. “कृतघ्न नारायण राणे मी तुला वचन देतो, की तू मेल्यानंतर तुझ्या अस्थी काशीमध्ये विसर्जित करु देणार नाही. तुझा आत्मा शतकानुशतके भटकत राहील”, अशी पोस्ट पाठक यांनी ट्विटरवर केली आहे.

Vishwa Hindu Sena president Arun Pathak :

म्हणून पाठक यांनी ठेवलेय 51 लाखांचे बक्षिस:
नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल खालच्या थराला जाऊन वक्तव्य केले. यामुळ संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचा वातावरण पाहायला मिळाले. राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी राणेंच्या विरोधात आंदोलन, निषेध, जाळपोळ करण्यात आली. काही शिवसैनिकांनी राणेंच्या मुंबईतील घरावर दगडफेकही केली. काही ठिकाणी भाजप ऑफिसवर हल्ला करण्यात आले. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यात तुफान हाणामारी झाली. राणेंच्या या वक्तव्याचा देशभरातूनही निषेध करण्यात आला. आता अरुण पाठक यांनीही राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. इतकेच नव्हे तर राणेंना धमकी दिली आहे. त्यांचे शीर धडावेगळे करणाऱ्याला 51 लाख रुपयाचे बक्षिसही जाहीर केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Vishwa Hindu Sena president Arun Pathak announced 51 lakhs reward for beheading Narayan Rane.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x