9 May 2024 3:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ | अजून एका प्रकरणाची खुली चौकशी करण्याचे आदेश

Parambir Singh

मुंबई, २२ सप्टेंबर | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गैरव्यवहार प्रकरण एसीबी मार्फत चौकशीच्या रडारवर आहेत. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका नव्या प्रकरणाची यात भर पडली आहे. त्यामुळे लाचलुचपत खात्यांमार्फत या प्रकरणाचीही खुली चौकशी करावी, असे आदेश गृहविभागाने दिले आहेत. परमबीर सिंह यांच्या अडचणीत यामुळे वाढ झाली आहे.

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, अजून एका प्रकरणाची खुली चौकशी करण्याचे आदेश – One more case of open inquiry against for Mumbai police commissioner Parambir Singh :

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांच्या विरोधात आधीच एका प्रकरणात खुली चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्या आरोपावरून ही चौकशी केली जात आहे. निलंबित डांगे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणाची खुली चौकशी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र लिहून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मागणी केली होती.

याबाबत प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्याने सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला खुली चौकशी करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर यांच्याविरोधात कट रचणे, पुरावे नष्ट करणे, आणि अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्या चौकशीनंतर अनेक प्रकरणाचा उलगडा होणार आहे. मात्र माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या परमबीर सिंहांचा पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: One more case of open inquiry against for Mumbai police commissioner Parambir Singh.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x