12 December 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या
x

AtumVader Electric Bike | ऑटुमवॅडर इलेक्ट्रिक बाइक लॉन्च | एका चार्जवर 100 किमी | ९९९ रुपयात बुकिंग

AtumVader Electric Bike

AtumVader Electric Bike | ऑटोमोबाइल नावाच्या नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल ब्रँडने भारतात ऑटुमवॅडर ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या नव्या बाईकला कॅफे रेसर फॉरमॅटमध्ये डिझाइन करण्यात आलं आहे. ही बाईक 99,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आली असून सुरुवातीच्या किंमतीत ऑफर देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही किंमत फक्त पहिल्या 1000 खरेदीदारांना लागू असेल.

999 रुपयांच्या किंमतीत प्री बुकिंग :
ऑटुमवॅडर इलेक्ट्रिक बाइकही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 999 रुपयांच्या किंमतीत प्री बुकिंगसाठी उपलब्ध आहे. ही बाईक रेड, व्हाइट, ब्लू, ब्लॅक आणि ग्रे अशा एकूण पाच रंगात उपलब्ध आहे.

एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावेल :
इलेक्ट्रिक कॅफे रेसर बाइक ऑटोमोबाइल सिंगल चार्जवर १०० किमी राइडिंग रेंजसह येईल, असा दावा कंपनीने केला आहे. बाइकचा टॉप स्पीड ६५ किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. ही बाईक २.४ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकवरून चालते. अतूवॅडर ई-बाइक ट्यूबलर चेसिसवर तयार करण्यात आली असून १४ लीटरची बूट स्पेसही मिळते. याशिवाय बाइकमध्ये एलईडी स्क्रीन आणि टेल-लॅम्प्सही मिळतात.

वर्षाला 3,00,000 बाईक्स उत्पादन क्षमता :
ऑटोमोबाइलचे संस्थापक वामसी जी कृष्णा यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या संशोधन आणि विकास तज्ञांच्या मदतीने आणि भारतीय रस्ते आणि रायडर्स लक्षात घेऊन शून्य-उत्सर्जन सुविधांच्या मदतीने या इलेक्ट्रिक बाईकची रचना केली आहे. ही एक टिकाऊ इलेक्ट्रिक बाईक आहे. नवीन ऑटुमवॅडर इलेक्ट्रिक बाईक तेलंगणातील कंपनीच्या पटनचेरू सुविधेत तयार केली जाईल. कंपनीचा दावा आहे की, या सुविधेची वर्षाला जास्तीत जास्त उत्पादन क्षमता 3,00,000 इलेक्ट्रिक बाईकची आहे.

हायस्पीड बाइक :
ई-बाइक ब्रँडने लाँच केलेली ऑटुमवॅडर ही पहिली बाइक नाही. कंपनीने ऑक्टोबर २०२० मध्ये ऑटुम १.० लाँच केले. या ब्रँडने आतापर्यंत बाइकच्या एकूण १००० युनिट्सची विक्री करण्यात यश मिळवले आहे. अॅटम 1.0 ही एक लो स्पीड इलेक्ट्रिक बाईक होती. त्या तुलनेत ऑटुमवॅडर ई-बाइक ही हायस्पीड इलेक्ट्रिक बाइक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: AtumVader Electric Bike launched check price in India details 03 July 2022.

हॅशटॅग्स

#AtumVader Electric Bike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x