12 December 2024 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

गुप्तचर यंत्रणांचा इशारा | मुंबई ट्रेनमध्ये विषारी वायू तर गर्दीच्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र?

Mumbai Train

मुंबई, १८ सप्टेंबर | नवी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या दहशतवादांकडून नवनवे खुलासे होत आहे. या दहशतवाद्यांच्या षडयंत्रबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवादांचा मोठ्या घातपाताचा कट होता. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं, असंही समजतंय. त्यातच मुंबई लोकलही दहशतवाद्यांच्या निशाणावर होतीच मात्र रेल्वेत विषारी वायू सोडून घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांच्या सुत्रांनी दिली आहे.

गुप्तचर यंत्रणांचा इशारा, मुंबई ट्रेनमध्ये विषारी वायू तर गर्दीच्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र – Mumbai Railway Police got intelligence alert about gas attacks on Mumbai local trains :

अटक करण्यात आलेले दहशतवादी इतर ठिकाणांव्यतिरिक्त मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये स्फोट घडवण्याचा कट आखत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिली आहे. प्रसार माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याविषयी गुप्तचर माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांनी लोकल ट्रेनवर गॅस हल्ला किंवा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र आखलं आहे.

Alert issued for terrorist attack in Mumbai, there may be a gas attack in the Mumbai Local train :

तसंच रेल्वे पोलिसांना विविध एजन्सींकडून नवीन धमक्या येत असून त्याआधारे ही माहिती मिळाली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद म्हणाले, ”आम्हाला वारंवार दहशतवादाच्या धमक्या येत आहेत. विशेषत: लोकल ट्रेनसाठी आलेली धमकी तसंच आम्ही प्रत्येक धमकी गंभीरपणे घेतली गेली आहे. आम्ही आलेल्या धमक्यांवर विशेष लक्ष देऊन विविध पावले उचलत आहोत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Mumbai Railway Police got intelligence alert about gas attacks on Mumbai local trains.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x