2 May 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Dracunculus Medinensis symptoms | 'नारू' आजार ज्याची अनेकांनी माहिती नाही | लक्षणे व उपचार - नक्की वाचा

मुंबई, २० ऑगस्ट | अठराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेच्या गिनी समुद्रकिनाऱ्यावर नारूचा प्रथम कृमी आढळला. याला गिनी वर्म असेही म्हणतात. नारू हा आजार हात,पाय किंवा खांद्यावर झालेला दिसून येतो. मादीच्या विषारी स्रावापासून त्वचेखाली फोड तयार होतो आणि फोड फुटून तेथे व्रण तयार होतो. या व्रणाच्या तळाशी द्रव बाहेर येत असतो.

‘नारू’ आजार ज्याची अनेकांनी माहिती नाही, लक्षणे व उपचार (Dracunculus Medinensis symptoms and treatment in Marathi) :

नारू झाल्यास फोड उठण्यापूर्वी मळमळते आणि प्रसंगी उलट्या आणि चक्कर सुद्धा येते. या फोडाचे रूपांतर गँगरीन किंवा धनुर्वात यामध्ये सुद्धा होऊ शकते. या आजारामुळे पुन्हा पुन्हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नारू झालेल्या व्यक्तीला पिण्याच्या पाण्याच्या जवळ येऊ देऊ नये. हा आजार जीवघेणा नसून यावर उपचार उपलब्ध आहे.

एकदा नारूच्या कृमीचा (Dracunculus Medinensis symptoms and treatment) संसर्ग झाल्यास मानवी शरीरात त्याविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होत नाही. त्यामुळे पुन:पुन्हा संसर्ग होऊ शकतो. त्यावर दूषित पाण्याचा उपसा करणे आणि नारू झालेल्या रुग्णाला पिण्याच्या पाण्याजवळ येऊ न देणे, हे करणे गरजेचे असते. तसेच पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्लोरिन मिसळणे, पाणी गाळणे व उकळणे हे देखील उपाय उपयुक्त ठरतात.

मेट्रोनिडेझोल आणि थायबेंडाझोल ही औषधे नारू या मादीचा नाश करण्यास उपयोगी आहेत. १९९६ सालापासून भारतात या आजाराचे रुग्ण आढळल्याचे दिसून आलेले नाही. आफ्रिका खंड्याच्या काही भागात अजूनही या रोगाचे रुग्ण आढळतात. या रोगावर कुठलीही ठराविक लस आणि औषध नाही. प्राथमिक उपचार करून हे बरं केलं जाऊ शकत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Dracunculus Medinensis symptoms and treatment in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x