12 December 2024 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

सज्जन भाजप आमदाराच्या मुलाच्या घरी सापडली करोडोची रोख रक्कम, भाजप आमदार आरोपी नंबर वन

Karanataka state BJP MLA

BJP Karnataka MLA | कर्नाटकातील भाजपचे आमदार एम. विरुपाक्षप्पा यांचा मुलगा ४० लाख रुपयांची लाच घेताना पकडला गेल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात भाजप आमदाराला पहिला आरोपी बनवण्यात आले आहे. लाच घेताना पकडल्यानंतर अटक करण्यात आलेला विरुपाक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत याला लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लाचप्रकरणानंतर त्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले होते, त्यात 6 कोटी रुपयांची रोकड सापडली होती. याशिवाय कार्यालयाकडून १ कोटी ७० लाख रुपयांची रक्कमही वसूल करण्यात आली. निवडणुकीच्या वर्षात हे प्रकरण भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहे.

दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार एम. विरुपाक्षप्पा हे कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड या सरकारी कंपनीचे अध्यक्ष आहेत. याच कंपनीच्या कार्यालयात त्यांच्या मुलाला लाच घेताना अटक करण्यात आली. लाच घोटाळा उघडकीस आल्यानंतर विरुपाक्षप्पा यांनी शुक्रवारी सकाळी केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांचा मुलगा बेंगळुरू जल मंडळात मुख्य लेखापाल म्हणून काम करतो. विरुपाक्षप्पा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी आपल्या कुटुंबाविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विरुपाक्षप्पा यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “माझ्या कुटुंबाविरोधात षडयंत्र रचले गेले आहे. माझ्यावर हे आरोप करण्यात आल्याने मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहे. कर्नाटकलोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी विरुपाक्षप्पा यांच्या मुलाला केएसडीएल कार्यालयात कंत्राटदाराकडून ४० लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. प्रशांत यांच्या कार्यालयातून १ कोटी ७० लाख रुपये असलेल्या तीन पिशव्याही जप्त करण्यात आल्याचे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजप आमदाराच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार
साबण आणि डिटर्जंट निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्या कंत्राटदाराशी ८१ लाख रुपयांच्या लाचेचा करार करण्यात आल्याचे लोकायुक्तांचे म्हणणे आहे. त्याअंतर्गत ४० लाख रुपये दिले जात असताना प्रशांतला अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांनाही १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. लोकायुक्त बी. एस. पाटील म्हणाले की, या प्रकरणी सरकारचा कोणताही दबाव नाही. स्वतंत्रपणे कारवाई केली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karanataka state BJP MLA under scanner in son bribe case 8 crore cash seized check details on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#BJP MLA(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x