महत्वाच्या बातम्या
-
जलयुक्त शिवार फसवी योजना | जादा पाण्याचा दावा खोटा | निकृष्ट दर्जाची कामं
फडणवीस सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारला आहे. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना म्हणावी लागेल आणि विशेष म्हणजे यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये देखील अनेक नकारात्मक टिपण्या करण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुढची विधानसभा महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपचे ५० आमदारही नसतील
राज्यात पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. दुसरीकडे सुशिक्षित मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नाकारून महाविकास आघाडीला मतदान केल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी नागपूर आणि पुण्यात देखील भाजपाला सपाटून मार खावा लागला होता.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी | त्यांचा पराभव होईल अशी भक्कम आघाडी
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? | त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
“राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भारतीय जनता पक्षात दिसले असते”, असा दावा त्यांनी केला होता. त्याच मुद्द्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. एक पत्रकाराने त्यांना, जयंत पाटील खरंच भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक उत्तर दिलं. “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”, असं उत्तर देऊन त्यांनी प्रश्नाला बगल दिली.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणे गंजलेली ताेफ | अशा तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं - जयंत पाटील
राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचं असं भाकीत वर्तवणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (NCP State President Jayant Patil criticized BJP MP Narayan Rane) अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून कोरोना जाण्याऐवजी वाढला - जयंत पाटील
कोरोनाच्या साथीची दुसरी लाट आलेल्या युरोपला पुढच्या सहा महिन्यांत खडतर स्थितीचा सामना करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे (World Health Organization) संचालक हान्स क्लूग यांनी सांगितले. नागरिकांनी नीट दक्षता न घेतल्यास साथीचे संकट आणखी गडद होऊ शकते असेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे आमदार फुटू नये म्हणून काही दिवस ते सरकार पडणार असं बोलत राहतील - जयंत पाटील
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पक्ष सोडून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश करु नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत बोलावं लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार, असं वारंवार बोलावं लागतं. अजून काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, अशी खिल्ली उडविणारी टिपणी सुद्धा जयंत पाटील यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक प्रकरण फडणवीस सरकारनं दाबलं होतं | जयंत पाटील यांचा गंभीर आरोप
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्य सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नाही,”अशी भूमिका देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपात राजकीय भूकंप निश्चित | खडसेंसहित अनेक आमदार पक्ष सोडणार
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमधील आता निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांनी आज (२१ ऑक्टोबर) भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. “एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला ते आधी फडणवीसांनी स्पष्ट करावं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थिल्लरपणा करु नये असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकू नका असं म्हटलं आहे यावर आपलं काय म्हणणं आहे असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
OBC आरक्षणाला धक्का लावण्याबाबतचा विरोधक गैरसमज पसरवत आहेत – जयंत पाटील
ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जातोय. मात्र धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
तर तिन्ही पक्ष एक उमेदवार देतील | त्या आमदाराला राजकारणातून बाद केले जाईल
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार अशी अफवा भाजपवाले सतत पसरवत असतात. परंतू, महाविकासआघाडी सरकार पूर्णपणे स्थिर आहे. राज्यातील सरकार पडेल असे सांगणे हा केवळ भाजपचा स्वत:ला चर्चत ठेवण्याचा प्रयत्न आहे असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आमदार फुटणार नाही, फुटलाच तर ३ पक्षांच्याविरुद्ध निवडूनच येणार नाही - जयंत पाटील
राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीवरून टीका होताच स्पष्टीकरण प्रसिद्ध
नथुराम गोडसे नाट्य साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
'जलयुक्त शिवार' फक्त नाव गोंडस होतं; जयंत पाटलांचं वक्तव्य; योजनेची चौकशी होणार?
फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना आता दुसरं काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं: जयंत पाटील
महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नाही, खातेवाटप हे नक्की लवकरात लवकर होईल. फडणवीस म्हणतात तसं थोड्या दिवसांच सरकार हे थोडंथोडं करून पाच वर्षे पूर्ण करेल. तसेच, फडणवीस यांना आता दुसरं काही काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं, असा टोला राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांची बैठक पार पडल्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
कॅग'च्या रिपोर्टप्रमाणे फडणवीसांच्या काळात ६५ हजार कोटींचे घोटाळे - जयंत पाटील
तत्कालीन फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ नसल्याचा संशय कॅगने अहवालात व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात बेसुमार पैसेवाटप झाल्याचं म्हटलं आहे. दिलेल्या कामांमध्ये नगरविकास खात्याची कामं जास्त होती. त्यासाठी पाहिजे तसं पैशांचं वाटप करण्यात आल्याचं पाटील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
विधिमंडळातील घोषणाबाजी पेक्षा मोदींकडे राज्याच्या हक्काचे १४,६०० कोटी मागा: जयंत पाटील
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर, अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही आमदारांमध्ये समन्वय साधला. त्यानंतर, यांनी फडणवीसांनाच प्रश्न विचारले.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल: अर्थमंत्री जयंत पाटील
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर आज जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपद तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रीपद आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०२४ मध्ये राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष होईल; भाजपात गेलेले आमच्या संपर्कात: जयंत पाटील
भारतीय जनता पक्षात अनेक गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करुन आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा एनसीपी’चे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. २०२४ मध्ये एनसीपी राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल यासाठी प्रयत्न करु असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सांगलीमधील इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE