13 December 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Aadhaar Card New Rule | आधार कार्डवरील माहितीचा विस्तार वाढणार, जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद आधार कार्डवर दिसणार

Aadhaar Card New Rule

Aadhaar Card New Rule | भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड ते या देशाचे नागरिक असल्याचा महत्वपूर्ण पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार जेव्हा लहान असताना काढलेले असते तेव्हा त्यावरील तपशील ८ वर्षांनी बदलावा लागतो. त्यामुळे आधार अपडेट असावे. तसे नसल्यास शालेय, शासकीय आणि विविध कामांमध्ये अडची निर्माण होऊ शकतात. आधार कार्ड आज प्रत्येक नागरिकाकडे आहे. अशात अनेक ठिकाणी त्याचा वापर करुण फसवणूकीच्या घटना घडत आहेत. ही बाब लक्षात घेता UIDAI ने आधार कार्ड संबंधीत काही अपडेट येणार असल्याची घोषणा केली आहे.

UIDAI ने केलेली घोषणा
आता पर्यंत आधार कार्डवर हयात असलेल्या व्यक्तीचे सर्व तपशील दिसत होते. मात्र आता व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद देखील आधार कार्डवर होणार आहे. जेव्हा एखादे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या नावाने आधार क्रमांक जारी केला जातो. त्यात नंतर सर्व तपशील अपडेट केले जातात. त्याच प्रमाणे आता मृत्यू झाल्यावर त्याची नोंद होणार आहे. याने ते आधार कार्ड बंद करता येईल आणि त्याचा कोणी दुरउपयोग करु शकनार नाही.

पायलट प्रोजेक्ट योजना
पायलट प्रोजेक्ट योजनेत होत असलेली फसवणूक जास्त प्रमाणात थांबवता येणार आहे. यात जन्मानंतर आधार क्रमांक दिल्याने त्या मुलाला आणि त्याच्या कुटूंबियांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे की नाही हे पाहता येते. यात डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर या योजनेच्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या आधार कार्डवर देखील अनेक व्यक्ती लाभ घेत असतात. त्यामुळे असे प्रकार यातून थांबवण्यासाठी मृत्यूची नोंद देखील केली जाणार आहे.

झिरो आधार होणार सुरु
आजही भारतात असे अनेक नागरिक आहेत ज्यांना राहण्यासाठी स्वत: चे घर नाही. त्यामुळे पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्न अशी माहिती आधार कार्ड बनवताना लागते. मात्र आता झिरो आधरच्या सहाय्याने प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड बनवता येईल. याने ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्या व्यक्ती ते चुकिच्या पध्दतीने मिळवणे थांबवतील. झिरो आधारमध्ये देखील एक क्रमांक त्याच व्यक्तीच्या नावे जारी केला जाणार आहे. यात उत्पन्नाचा कोणताही पुरावा दाखवण्याची आवश्यकता नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Aadhaar Card New Rule The record from birth to death will be on the Aadhaar card 02 April 2023.

हॅशटॅग्स

Aadhaar Card New Rule(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x