महत्वाच्या बातम्या
-
लज्जास्पद! दागिने चोरी प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांच्याविरोधात कोर्टाचं अटक वॉरंट
Union Minister Pramanik | पश्चिम बंगालच्या अलिपुरद्वार येथील न्यायालयाने केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. १३ वर्षांपूर्वी दोन दागिन्यांच्या दुकानात झालेल्या चोरीच्या प्रकरणात कोर्टाने हा आदेश दिला आहे. या खटल्याची सुनावणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रमाणिक हे या 13 वर्ष जुन्या चोरीच्या गुन्ह्यांत आरोपी आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bhabanipur Bypoll Result | ममता बॅनर्जींचा भवानीपूर पोटनिवडणुकीत दणदणीत विजयी
विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये भाजप भुईसपाट होण्याच्या दिशेने | भाजपचे २ खासदार आणि १ आमदार टीएमसीमध्ये प्रवेश करणार
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूलकडून भाजपला सातत्याने धक्के बसत आहेत. माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर आता इतर आमदार टीएमसीमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) खासदार सुनील मंडल, अशोक डिंडा आणि भाजपचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांची केंद्रीय सुरक्षा काढली आहे आणि ममता सरकारला सुरक्षा पुरवण्याचे आवाहन केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
ममता प. बंगालमध्ये भाजपला भुईसपाट करतील अशी भीती? | प. बंगाल भाजपमध्ये अचानक पक्षांतर्गत खांदेपालट
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भवानीपूर मधील पोटनिवडणूक जवळ आली असताना भाजपने राज्य पातळीवर संघटनात्मक मोठा बदल केला आहे. प्रदेशाध्यक्षपदी सुकांत मुजुमदार यांची निवड करण्यात आली असून पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची बढती देऊन त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. भाजपमधून होणारी पडझड रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये तळागाळातील मूळ भाजपवासीयांकडे दुर्लक्ष करून इतर पक्षातून आलेल्यांना उच्च पद दिले जाते - बाबुल सुप्रियो
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
3 वर्षांपूर्वी -
MP Babul Supriyo Joins TMC | भाजपाला राजकारणातून संन्यासाची टोपी लावून खा. बाबुल सुप्रियो तृणमूलमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनी राजकीच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
योगी यांच्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास म्हणजे प. बंगालच्या पायाभूत सुविधांचे फोटो चोरून वापरने - अभिषेक बॅनर्जी
देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच उत्तर प्रदेशात कोरोनामुळे स्थिती अत्यंत भीषण असल्याचं देखील देशाने अनुभवलं आहे. परिणामी योगी सरकारसाठी आगामी निवडणुका कठीण झाल्याचं म्हटलं जातंय.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपचे कालिगंजचे आमदार सौमेन रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे कालिगंजमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय यांनी पक्षाला निरोप देतानाच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. सौमेन यांनी या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालीगंज मतदारसंघातून तृणमूल उमेदवार तपन देब सिंघा यांचा 94,948 मतांनी पराभव केला होता.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का | विद्यमान आमदाराचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बगदाचे भाजप आमदार विश्वजित दास आणि नगरसेवक मंतोष नाथ यांनी आज सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर, विश्वजित दास म्हणाले की, काही गैरसमजांमुळे काही बदल करण्यात आले होते जे व्हायचे नव्हते. मी आता माझ्या घरी परतलो आहे आणि मी माझ्या राज्यातील आणि मतदारसंघातील लोकांसाठी काम करत राहीन.
3 वर्षांपूर्वी -
फोन रेकॉर्ड केले जातात | त्यामुळे मी शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू शकत नाही - ममता बॅनर्जी
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत ‘खेला’ होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत 'खेला' होणार | ममता कडाडल्या
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत ‘खेला’ होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय पक्षाचा विचार आता जुना झाला | भाजपच्या पराभवासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधावी - महुआ मोइत्रा
राष्ट्रीय पक्षाचा विचार आता संपुष्टात आला आहे. काळ बदलला आहे. राष्ट्रीय पक्षासोबत लढताना पूर्वी राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची गरज असायची. आता प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाच्या राजकारणाला नवा आकार दिला. बंगालमधील विजयामागे अनेक कारणे आहेत, असे मला वाटते. कोणत्याही लाटेची चिंता न करणारा नेता तृणमूलमध्ये आहे असं तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | पंतप्रधान मोदींच्या त्या कॉलनंतरही मुकुल रॉय तृणमूलमध्ये परतले
भारतीय जनता पक्षात नाराज असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मुकुल रॉय यांनी अखेर तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. आपला मुलगा आमदार शुभ्रांशू रॉय आणि समर्थकांसह त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपवर नाराज होते. या दरम्यान, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क पुन्हा वाढवला. भाजपच्या कित्येक बैठकांमध्ये गैरहजर असताना त्यांनी पत्नी आजारी असल्याचे कारण दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल भाजपाला धक्का | भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. मुकूल रॉय तृणमूलमध्ये प्रवेश करणार
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींचे पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये भाजप टेन्शनमध्ये | ममता बॅनर्जी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल या आशेनं तृणमूलच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला. मात्र भारतीय जनता पक्षाला शंभरीदेखील गाठता आली नाही. तर तृणमूलनं २०० हून अधिक जागा मिळवल्या. पुढील पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करणं अतिशय कठीण असल्याची कल्पना संबंधित दलबदलूंना आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली असून फार आधीच त्यांनी हा निर्णय घेतला असता तर अनेक जीव वाचले असते असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपमधील अंतर्गत वाद पेटला, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गोंधळ
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी ते कार्यकर्ते सर्वच असंतुष्ट असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ममता बॅनर्जींचं राजकीय वजन वाढल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल | मोदींचा फोटो नव्हे, आता लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर ममतांचा फोटो दिसणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहायला मिळायचे, मात्र आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक
कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल | भाजपचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर | मोदी-शहांची डोकेदुखी वाढणार
प. बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. परंतु, तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News