14 June 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

भाजपाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत ढिसाळ कारभार | ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

Nashik Oxygen Tank Leak

नाशिक, २१ एप्रिल: राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

रुग्णालयात पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या पाइपमधून गळतीला सुरुवात झाली. आता हे पाइप कापून दुरुस्त करण्यात आले. परंतु, दुरुस्तीच्या कालावधीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने काहींचा जीव गेला. रुग्णालयात 171 कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर होते. तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 22 जणांच्या मृत्यूनंतर आणखी काही रुग्णांची अवस्था गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या नाशिक महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे.

 

News English Summary: While there is a shortage of oxygen in the state on the one hand, on the other hand, a shocking accident has taken place at the Zakir Hussain Hospital in Nashik. It is learned that more than 11 patients were killed in this oxygen leak accident. Meanwhile, the fire brigade is currently working to stop the leak.

News English Title: Nashik Oxygen Tank Leak in corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x