27 April 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार
x

तेलंगणा,राजस्थानमध्ये आज मतदान; अनेक बुथवर EVM मध्ये बिघाड

जयपूर-हैदराबाद : आज राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाड होण्याच्या घटना समोर येत आहेत असे वृत्त आहे.

राजस्थानमध्ये एकूण १९९ जागांसाठी २२७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. असं असलं तरी मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपा दोन पक्षांमध्येच आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा जरी पणाला लागली असली तरी विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मोदी यांनी शेवटच्या टप्यात विशेष जोर लावल्याने उत्सुकता वाढली आहे.

दुसरीकडे, तेलंगणामध्ये एकूण ११९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर मुख्य आवाहन हे काँग्रेसचे आहे. येथे ३२ हजार ७१५ केंद्रांवर मतदान होत आहे. अंदाजे ३ कोटी नागरिक आज मतदानाचा हक्क बजावतील असे वृत्त आहे.

या दोन्ही राज्यांमध्ये आज पार पडत असून निकाल ११ डिसेंबरला रोजी घोषित होणार आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x