26 April 2024 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

अमरावती लोकसभा: नवनीत रवी राणा यांना जागोजागी मोठा प्रतिसाद, खासदार अडसुळांचा मार्ग खडतर?

अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सर्वच राष्ट्रीय पक्ष जोरदार कामाला लागले असून प्रत्येक जागा प्रतिष्टेची करण्यात आली आहे. निकालाअंती कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे महत्व प्रचंड वाढणार आहे, यात शंका नाही. त्यातीलच शिवसेनेसाठी महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ येथील विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेतील एक मोठं नाव असलं तरी आगामी निवडणुकीत त्यांचा लोकसभेचा मार्ग खडतर असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत.

शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ हे सिटी को ऑप. बँकेचे अध्यक्ष आहेत. सिटी को ऑप. बँकेच्या एकूण दहा शाखा असून रिझर्व्ह बँकेकडून आधी म्हणजे डिसेंबरमध्ये एक नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतरच १७ एप्रिलला आरबीआयकडून सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व बचत आणि सेव्हिंग, चालू आणि करंट अकाऊंट आरबीआयने सील करून सिटी को ऑप. बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आणि हि बातमी पसरताच बँकेच्या ग्राहकांनी थेट बँकेच्या शाखेत धाव घेतली. ग्राहकांनी जेंव्हा आम्हाला आमचे पैसे परत हवे, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना सिटी को ऑप. बँकेच्या प्रशासनाने स्पष्ट केलं की, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे हे शक्य नसल्याचं आम्ही त्या बाबतीत काहीच करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या राजकीय प्रतिमेला सुद्धा धक्का लागला आहे.

दरम्यान, बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत रवी राणा यांनी ‘युवा स्वाभिमान पार्टीच्या’ ताकदीवर अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचे जोरदार रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे त्यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी मागील काही महिन्यापासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आमदार रवी राणा यांचे सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत देखील सलोख्याचे संबंध असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. परिणामी अमरावतीत सामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न मार्गी लावण्यास त्यांना मदत होते.

अमरावतीतील लोकसभेच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या प्रचारात नवनीत रवी राणा यांना तरुण-तरुणींचा आणि विशेष करून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येते. पक्ष विदर्भातील असला तरी समाज माध्यमांचा सुद्धा शिस्तबद्ध वापर करण्यास पक्षाने सुरवात केली आहे. त्यामुळे तरुण सुद्धा मोठ्यासंख्येने पक्षासोबत जोडले जात आहेत. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या अर्थकारणाची सुद्धा साथ गरजेची असते, जी त्यांच्यासोबत असल्याने गरीब आदिवासी भागात अनेक समाज सेवेची कामं करून सामान्य अमरावतीकरांना पक्षाकडे आकर्षित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच लोकसभा मतदारसंघातील सुशिक्षित आणि उच्चवर्णीय समाजावर देखील नवनीत रवी राणा या सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून छाप पाडण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी उडवलेला प्रचाराचा धडाका आणि पक्षविस्तार, आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावतीचे विद्यमान शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा लोकसभेचा मार्ग खडतर करणार हे निश्चित, असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

नवनीत रवी राणा यांचा अमरावतीत असा जंगी प्रचार सुरु आहे आणि प्रतिसाद विरोधकांना धडकी भरवणारा;

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x