18 May 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
x

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांची माध्यमांना प्रतिक्रिया देताना जीभ घसरली, म्हणाले 'हे बायकी धंदे उद्धव ठाकरेंना शोभतात'

CM Eknath Shinde

Andheri East By Poll Election | मुंबई पालिकेचे आयुक्त महापालिकेने लटके यांचा राजीनामा मंजूर केला नाही, तर तो उद्धव ठाकरे यांचावर अजून दबाव वाढवू शकतो. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. निवडणूक लढण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा देणं बंधनकारक असतं, पण अजूनही महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.

ऋतुजा लटके यांनी सुरूवातीला राजीनामा दिला होता, पण या राजीनाम्यामध्ये त्यांनी अट घातली होती. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये विजय झाला तर आपला राजीनामा मंजूर करावा, असं त्यांनी अर्जामध्ये नमूद केलं होतं. असा अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबरला राजीनाम्याचा नवा अर्ज सादर केला.

दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळलेला नाही. नियमानुसार मी 30 दिवसांमध्ये राजीनाम्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर 2022 राजीनामा दिला. सरकारकडून दबाव असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं इक्बाल सिंग चहल म्हणाले आहेत.

अनिल परब यांची पत्रकार परिषद :
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर राजकीय दबावाचा आरोप केला. शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना अनेक अमिषे दाखवण्यात येत आहेत. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. पण ऋतुजा लटके या कट्टर शिवसैनिक आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. त्या शिवसेनेतच राहतील. त्यांचा राजीनामा मंजूर झाला तर त्या शिवसेनेकडूनच लढतील, असं त्यांनी सांगितलं.

शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया :
दरम्यान, अनिल परब यांच्या आरोपांवर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांना प्रसार माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला असता त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. किरण पावसकर म्हणाले, ‘ऋतुजा पाटील आलेल्या नाहीत, त्या भेटलेल्या नाहीत आणि शिंदे साहेबांनी बोलवलेलं देखील नाही, कारण अशावेळी एका आमदाराच्या पत्नीला ती तिकडून उभी राहत असेल तर एवढ्या खालच्या लेववच राजकारण शिंदे साहेब कधी करणार नाहीत… मर्द आहेत… बंड करताना ४० लोकं बरोबर घेऊन जाऊन मुख्यमंत्री म्हणून बसले… ते एका कोना लेडीजला बोलावं आणि हे धंदे ते करणार नाहीत… हे बायकी धंदे उद्धव ठाकरेंना शोभतात असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केल्याने ते मोहा टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp spokesperson Kiran Pawaskar statement on Andheri East By Poll candidate Rutuja Latke check details 12 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x