3 May 2024 12:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

अमोल कोल्हे राष्ट्रवादीत जाताच बिथरलेली सेना स्थानिक मनसे आमदाराला फोडण्याच्या तयारीत?

Sharad Sonawane, MNS, Raj Thackeray, Udhav Thackeray, Shivsena

मुंबई : अभिनेते अमोल कोल्हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत जाताच आढळराव पाटलांच्या जय पराजयाच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आत्तापासूनच जमवाजमव सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यात मनसेचे आमदार शरद सोनावणे यांचा जुन्नर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेत येत असल्याने सेनेकडून त्यांना फोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

त्यासाठी सकाळपासूनच आमदार शरद सोनावणे यांच्याबद्दल समाज माध्यमांवर जोरदार अफवा सुरु केल्या आहेत. दरम्यान प्रसार माध्यमांनी जेव्हा त्याचाशी संपर्क केला तेव्हा ते म्हणाले की, ‘मी मनसेतच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मी बिलकूल नाराज नाही. शिवसेनेकडून अद्याप कोणताच प्रस्ताव मला आला नाही’ अशी प्रतिक्रीया मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी दिली. तसेच शिवसेनेकडून कोणता प्रस्ताव आल्यास मी आधी राज ठाकरे यांची भेट घेऊनच निर्णय घेईन’ असेही ते पुढे म्हणाले.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जुन्नर येथील आमदार शरद सोनावणे हे पक्ष सोडून शिवसेनेच्या वाटेवर जात असल्याची चर्चा रंगू लागली. एकमेव आमदाराने सोडचिठ्ठी दिल्यास पक्षाला मोठा फटका बसेल. याबाबत सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘अभिनेता अमोल कोल्हे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यामुळे शिवसेनेची नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना स्वगृही बोलवण्याबाबत बैठका सुरू आहेत. अशा वातावरणात मी शिवसेनेत जात असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र माझ्यापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आला नाही.’ असे ते म्हणाले. तसं असलं तरी शरद सोनावणे यांच्या सेनेतील जुन्नर पदाधिकारी प्रचंड संतापले आहेत आणि ते जर शिवसेनेत आले तर जुन्नर शिवसेनेत उभी फूट पढू शकते असं म्हटलं जात आहे. यादरम्यान २०१४ मध्ये निवडणुका लढवण्यासाठी ते इच्छुक असताना देखील उद्धव ठाकरे यांनी शरद सोनावणे यांची दखल घेतली नव्हती आणि मनसेने त्यांना संधी दिली. त्यानंतर ते २०१४च्या निवडणुकीत मनसेच्या तिकीटाद्वारे आमदार म्हणून निवडणून आले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x