8 May 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

भाजप महिला नेत्या रिदा रशीद यांनी विधवा महिलेला नोकरीच्या मोबदल्यात वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलं, गंभीर गुन्हा दाखल

Rida Rashid

Rida Rashid BJP | भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांच्याविरोधात वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. रिदा रशीद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. या त्याच भाजप महिला नेत्या आहेत ज्यांनी जितेंद्र आव्हाडांवर विनयभंग केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

रिदा रशीद या मुंब्रा परिसरात समाजसेविका म्हणून वावरत आहे. त्यांच्याकडे घटस्फोटीत महिला नोकरीसाठी गेल्या असता त्यांना हॉटेलमध्ये गैरकृत्य करण्यास पाठविण्यात आल्याची तक्रार महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून तथाकथित समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. १२०४ भादंवि ३७०(ए), पॉक्सो अंतर्गत कलम ४, १०, ६, आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र मुंब्रा पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.

13 नोव्हेबंर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिळफाटा येथे एका उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार रिदा रशीद यांनी केली होती. रिदा रशीद या 40 वर्षीय तक्रारदार महिलेनं आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला होता. त्यानंतर रिदा राशिद यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rida Rashid BJP case has been registered against Rida Rashid check details on 24 December 2022.

हॅशटॅग्स

#Rida Rashid(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x