5 May 2024 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

निर्भया प्रकरण: नराधमांना ३ मार्च रोजी फासावर लटकवणार

Delhi, Nirbhaya Gangrape

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना येत्या ३ मार्चला फाशीवर लटकवण्यात येणार आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. निर्भया बलात्कारातील नराधमांविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. येत्या ३ मार्चला सकाळी ३ वाजता चारही दोषींना फासावर लटकवण्यात येणार आहे. दिल्ली कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला.

आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, ” आमच्याकडे अद्यापही पर्याय बाकी आहेत. प्रसारमाध्यमांचा आणि राजकारण्यांचा दबाव असल्याने कोर्टाने डेथ वॉरंटची तारीख दिली आहे.” दरम्यान निर्भयाच्या आईने या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. “आता ३ मार्च ही तारीख पुढे ढकलली जाणर नाही आणि त्या दिवशीच चारजणांना फाशी दिली जाईल अशी आशा आहे” असंही त्या म्हणाल्या आहेत.

११ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयानं ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती. हे सगळे दोषी न्याय प्रक्रियेशी खेळत असल्याचा आरोप निर्भयाच्या आई-वडिलांनी केला होता.

 

Web Title: Story Delhi Nirbhaya Gangrape death warrant by Patiala house court issued.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x