2 May 2024 2:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

मोदींच्या अविकसित गुजरातच्या भिंती इंग्लंडच्या प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या; देशाचे वाभाडे

US President Donald Trump, PM Narendra Modi, wall slum, Ahmedabad

लंडन: राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्या भारत दौऱ्यासाठी आपण अत्यंत उत्साही असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत ५ ते ७ लाख लोक माझं स्वागत करतील, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यात मोटेरा स्टेडिअमच्या नूतनीकरणानंतर निर्माण झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमचं लोकार्पण करणार आहेत. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असेल.

जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या स्वगातासाठी गुजरातमध्ये स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरात सरकारकडून अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी तयारी सुरू केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या प्रवासात ट्रम्प यांना झोपड्यांचं दर्शन होऊ नये यासाठी एक मोठी भिंतही उभारण्यात येते आहे.

१६ जानेवारी रोजी परराष्ट्र खात्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावित भेटीसंदर्भात मुत्सद्दी मार्गांद्वारे भारत आणि अमेरिका संपर्कात होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्ली येथे एका संमेलनादरम्यान सांगितले की “अनेक महिन्यांपासून अशी अटकळ बांधली जात आहे … पंतप्रधान मोदींनी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा त्यांना भारतात आमंत्रित केले होते. दोन्ही देश आमच्याशी संपर्क साधत आहे. जेव्हा आम्हाला ठोस माहिती मिळेल तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

दरम्यान, विकसित भारताचं स्वप्नं दाखवणाऱ्या गुजरातमध्ये भाजपाची मागील २५ वर्षांपासून सत्ता आहे आणि त्यात मोदींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सर्वाधिक आहे. आज मोदी देशाच्या पंतप्रधानपदी असून ही त्यांची दुसरी टर्म आहे. मात्र गुजरातमधील मुख्य शहरांमधील विदारक वास्तव समोर आलं आहे. ‘हम तो फकीर आदमी है, झोला लेके आये थे झोला लंके जायेंगे’ असं म्हणत मला गरिबीचं काहीच वाटत नसल्याचं सांगणाऱ्या मोदींच्या गुजरातमध्ये सध्या गरिबांच्या झोपड्या झाकण्यासाठी भिंती टाकण्याचे प्रताप सुरु आहेत.

मात्र त्याहून गंभीर बाब म्हणजे याची दखल आता आंतरराष्ट्रीय आणि प्रगत राष्ट्रांमधील प्रसार माध्यमांनी घेतल्याने मोदींचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडल्याची चर्चा रंगली असून, मात्र त्याहून खेदाची गोष्ट म्हणजे यामुळे भारताचीच अवहेलना होताना दिसत आहे. इंग्लंड’मधील “इंडिपेन्डन्ट” या प्रसिद्ध माध्यमाने गुजरातमधील या भिंतीची दखल घेतली असून त्यात कठोर विचार देखील मांडले आहेत.

“इंडिपेन्डन्ट” यामध्ये संपूर्ण विषय मांडताना असं देखील म्हटलं आहे की, ‘गुजरातमधील मोदींचे सर्वात मोठे शहर अहमदाबादमध्ये गरिब झोपडपट्टीवासीयांची घरं भिंतीने झाकली जातं आहेत आणि मोदी सरकार गरिबांना लपविण्यासाठी करदात्यांचे पैसे वाया घालवित आहे असे देखील नमूद केलं आहे.

पुढे “इंडिपेन्डन्ट”ने याच झोपडीतील एका गरिबांचे विचार देखील मांडले आहेत आणि त्यांनी म्हटलं आहे की “गरीबी आणि झोपडपट्टी हे आपल्या जीवनाचे वास्तव आहे, परंतु मोदी सरकारला गोरगरीबांना लपवायचे आहे,” असे तीन दिवसांपेक्षा जास्त काळ कुटुंबासमवेत वास्तव्य करणारे एक कामगार भाऊभाई मफाभाई म्हणाले.

 

Web Title: Story India US President Donald Trump visit PM Narendra Modi wall slum Ahmedabad.

हॅशटॅग्स

#india(222)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x