8 May 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

मुस्लिमांसाठी भारत स्वर्ग, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित: भाजप नेत्याची ग्वाही

Union Minister Mukhtar Abbas Naqvi, Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, २१ एप्रिल: देशभरात सुरु असणारे एकंदर धार्मिक वाद आणि धर्माच्या राजकारणावरुन काही अंशी दिसणारा असंतोष या साऱ्यामध्येच आता एका केंद्रीय मंत्रीमहोदयांचं वक्तव्य लक्ष वेधून जात आहे. अल्पसंख्यांक आणि मुस्लिम धर्मीयांसाठी भारत जणू स्वर्गच आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे.

रमजानचा पवित्र महिना २४ एप्रिलपासून सुरु होत आहे. अशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने नमाज, इफ्तार आणि इतर रुढी-परंपरा घराच्या आतच पार पाडाव्यात आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करावे, अशे आवाहन केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, भारत अल्पसंख्यक आणि मुसलमानांसाठी स्वर्ग आहे. त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अधिकार येथे सुरक्षित आहेत. जर कोणी हे पूर्वग्रहाने पाहत असेल तर त्यांनी वास्तवात असलेली परिस्थिती पाहिली पाहिजे आणि याचा स्वीकार करायला हवा.

ओआयसीने रविवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये भारताने मुस्लीम बांधवांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत असं म्हटलं होतं. तसेच देशामध्ये इस्लामविरोधी घटना थांबवाव्यात असंही ओआयसीने म्हटलं होतं. भारतीय प्रसारमाध्यमेही मुस्लिमांबद्दल नकारात्मक वृत्तांकन करुन दुजाभाव करत असल्याचा आरोप ओआयसीने केले होता.

याच संदर्भात नकवी यांना विचारण्यात आलं असता, “आम्ही आमचे काम योग्य पद्धतीने करत आहोत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान देशातील जनतेशी संवाद साधतात तेव्हा ते देशातील १३० कोटी जनतेच्या भल्याबद्दल बोलतात. जर काही लोकांना हे दिसत नसेल तर ती त्यांची अडचण आहे,” असं मत त्यांनी मांडलं.

 

News English Summary: The statement of one Union minister is now catching up to the current debate over the overall religious controversy and some dissatisfaction with the politics of religion. “India is like a paradise for minorities and Muslims,” said Union Minister Muktar Abbas Naqvi.

News English Title: Story India is heaven for Muslims says Union Minister Mukhtar Abbas Naqvi amid allegations of Islamophobia Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x