8 May 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

युरोपियन देशांप्रमाणे मुंबईत आवाजाचा नुमना घेऊन कोविड -19 टेस्ट करण्याचा प्रयोग

Corona patient, BMC, Voice sampling method

मुंबई, ९ ऑगस्ट : जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के इतका एवढा झाला आहे. राज्यात काल 11081 रुग्णांना घरी डिस्चार्ज दिला, आत्तापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67. 26 टक्के इतके आहे. राज्यात काल एक लाख 47 हजार 48 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण 41 हजार 266 पुणे येथे असून त्यानंतर 22943 ठाणे येथे आहेत. राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता 5 लाख 3 हजार 084 एवढी झाली आहे.

दरम्यान, राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. मुंबई जास्तीत जास्त चाचणी घेण्यावर भर दिला जात आहे. पण, आता मुंबईत आवाजाच्या नुमना घेऊन कोविड -19 चे निदान करण्यात येणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत पुढील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घेऊन चाचणी केली जाणार आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये एक हजार संशयित रुग्णांची पहिल्या टप्प्यात चाचणी केली जाणार आहे’ अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. प्राथमिक स्तरावरही चाचणी केली जाणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला आणि योग्य निकाल हाती आले तर याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.

फ्रान्स आणि इटलीसह काही युरोपियन देशांमध्ये कोविड -19 चे रुग्ण शोधण्यासाठी व्हॉईस अ‍ॅनालिसिसचा वापर करण्यात आला आहे. आपल्याकडेही नवी मुंबई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने व्हॉईस अ‍ॅनालिसिसचा प्रोग्राम सुरू केला होता. त्याचाच वापर आता केला जाणार आहे.

‘संशयित रुग्णाच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याची तुलना ही आरटी-पीसीआर निकालांशी केली जाणार आहे’, असंही काकाणी यांनी सांगितले. ‘जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मुंबईतील इतर रुग्णालयांमध्येही याचा वापर केला जाईल, ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत कमी वेळेत पोहोचता येईल’, असा विश्वासही ककाणी यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: According to the Times of India, a coronary artery bypass test will be conducted in Mumbai next week. One thousand suspected patients will be tested in the first phase at the Nesco Center in Goregaon, ‘said Mumbai Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani.

News English Title: Corona patient can now be found in Mumbai only by voice BMC use voice sampling method News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x