26 April 2024 9:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

बिहारच्या डीजीपींचा आनंद पाहून ते हातात भाजपाचा झेंडा घेणं बाकी होतं - संजय राऊत

Bollywood actor Sushant Singh, MP Sanjay Raut, Bihar DGP Gupteshwar Pandey

मुंबई, १९ ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर यावर आता आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

बिहारच्या डीजीपींनी कोणत्या गोष्टीचा एवढा आनंद झाला आहे की ते जागोजागी नाचत नाचत सांगत सुटले आहेत. पोलिसांच्या वर्दीचा एक मान असतो. त्यांनी हातात भाजपाचा झेंडा घेणं फक्त बाकी होतं,” असं मत राऊत यांनी नोंदवल्याचं नवभारत टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी गरज नव्हती असं मतही राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्याचे महाधिवक्त्या गृहमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. मंत्रालयात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक सुरू आहे. गृहमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध फेर विचार याचिका दाखल करायची की नाही याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीला राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, विधि व नाय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडली आहे. सुशांत सिंग प्रकरणी बैठक झाल्याचं सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली आहे.

 

News English Summary: The DGP of Bihar is so happy that he has left the place dancing and telling. The police uniform has a neck. The only thing left for him to do was to hold the BJP flag in his hand, Raut reported, according to the Navbharat Times.

News English Title: Bollywood actor Sushant Singh Death Sanjay Raut Slams Bihar DGP Gupteshwar Pandey News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x