27 April 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपचा लोकसभेत बहुमताचा आकडा घसरला

नवी दिल्ली : लोकसभेतील भाजपच्या खासदारांची संख्या थेट २७२ वर येऊन ठेपली आहे. २०१४ मधील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजप २८२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. परंतु हे संख्याबळ घटून थेट २७२ वर आलं आहे. त्यामुळे जय मोदी सरकारवर जर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर भाजपकडे खासदारांचं पुरेसं संख्याबळ नसल्याचे समोर येत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने बी. एस. येडियुरप्पा व श्रीरामुलु यांना खासदरकीचा राजीनामा दयावा लागला होता. त्यामुळे मोदी सरकारच २७४ खासदारांच संख्याबळ २७२ झालं आहे. त्यात भाजपचे निलंबित करण्यात आलेले खासदार किर्ती आझाद यांचाही समावेश आहे. तसेच पक्षात असून सुद्धा नैतृत्वावर टीका करणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुद्धा समावेश आहे. त्यात सुद्धा जर लोकसभा सभापतींचे मत सुद्धा ग्राह्य धरले जात नसल्याने भाजप २७२ हा बहुमतासाठी आकडा सुद्धा गाठणे कठीण आहे.

विशेष म्हणजे एनडीएतील घटक पक्ष म्हणजे टीडीपी सुद्धा एनडीएमधून बाहेर पडला आहे. शिवसेनेचे तर भाजप बरोबर अजिबात सूत जुळत नाही. त्यात शिवसेनेचे नेते खिशात ठेवलेले राजीनामे कधी काढतील याचा पत्ता नसला तरी दोघांमध्ये अजिबात पटत नाही सर्वश्रुत आहे. त्यामुळे जर अशी वेळ आली की, मोदी सरकारला त्यांचं बहुमत सिद्ध करावं लागेल तर मात्र भाजपवर कठीण परिस्थिती उद्भवू शकते आणि इतकेच नाही तर भाजपला लोकसभेतील सरकार गमवावे लागू शकते.

देशभरात होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला धक्के मिळत आहेत. येत्या २८ मे रोजी तब्बल ४ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन भाजप समोर आहे. तेच एकमेव कारण असेल ज्याने त्यांचा लोकसभेतील आकडा वाढू शकतो. तसे न झाल्यास भाजपसाठी खरोखरच धोक्याची घंटा ठरू शकते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x