28 April 2024 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

यूपीएच नेतृत्व | काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडूनही पवारांना समर्थन

Congress, Sushil Kumar Shinde, Sharad Pawar, UPA chairperson

सोलापूर, १२ डिसेंबर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने शरद पवार यांना विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Former Chief Minister Sushilkumar Shinde) यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या असून मोठे विधान केले आहे.

शरद पवार यांनी यूपीएच नेतृत्व केल्यास नक्कीच आवडेल, असे सूचक विधान शिंदे यांनी केले आहे. यावेळी ते म्हणाले की, सहस्त्रचंद्रदर्शनाचा हा सोहळा आहे. त्यांनी 50 वर्षांत अनेक चढ उतार बघितले, त्यांना अनेकांनी त्रास दिला मात्र त्यांनी सामाजिक समतोल बिघडू दिला नाही, स्मरणशक्ती प्रचंड आहे, पक्षाची जडणघडण त्यांना आठवते, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता, पद न मिळताही पवार साहेब आजही देशाचं नेतृत्व करत आहेत. पवारांनी च मला राजकारणात आणलं मोठं केलं. कारकिर्दीत माझी योग्यता नव्हती. पण पवार सर्वांना माझ्याबद्दल सांगायचे. चंद्रशेखर असो की आर के सिन्हा सर्वांना ते माझ्याबाबत सांगायचे. मी कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतलं तेही सांगायचे. एखाद्याला पुढे न्यायचे म्हटलं तर ते कशाही प्रकारे त्याला मोठं करतात, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

“शरद पवार यांची स्मरणशक्ती प्रचंड आहे. अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांच्या नावासकट त्यांना ते लक्षात ठेवतात. पक्षातील कार्यकर्ता आणि नेता कुणालाही ते सहज उपलब्ध होतात. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे शरद पवार. पवारसाहेब आजही देशाचं नेतृत्व करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. असा माणूस जर युपीएचा अध्यक्ष झाला तर मला नक्की आवडेल”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

 

News English Summary: Sharad Pawar’s memory is huge. After meeting many people, they remember them by name. They are readily available to party workers and leaders. After Yashwantrao Chavan, the most connected leader is Sharad Pawar. Pawar is still leading the country. Are asking common questions. If such a person becomes the president of UPA, I would definitely like it, ”said Sushilkumar Shinde.

News English Title: Congress senior leader Sushil Kumar Shinde support Sharad Pawar as UPA chairperson news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x