26 April 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मोजके सेलिब्रेटी सोडल्यास यातील एक तरी सेलिब्रेटी शेतकऱ्याच्या बाजूनं उभा राहिला आहे का?

Shivsena, MP Sanjay Raut, Celebrities, Rihaana tweet

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारतात देखील त्याचे पडसाद उमटले. यावरून अभिनेता अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, अजय देवगण आणि सायना नेहवालने ट्विट करण्यास सुरुवात केली. यामध्ये अजय देवगण सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अँपचा अँबेसिडर आहे. अक्षय कुमार एक अघोषित मोदी भक्त आहे. लता मंगेशकर यातर मोदींना मोठे बंधू मानतात आणि अमित शाह यांनी भाजपच्या ‘संपर्क पे चर्चा’ अभियानावेळी तर लता दीदींच्या घरी विशेष भेट दिली होती. तर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे बीसीसीआय’शी संबंधित असल्याने आणि अमित शहा यांचे पुत्र जय शहा सध्या बीसीसीआय’चे सचिव आणि अघोषित सर्वेसेवा झाले आहेत. यावरून कोहली आणि अर्जुन तेंडुलकरच्या भविष्यासाठी सचिनची अवस्था समजू शकतो. त्यात सायना नेहवाल’ने तर अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान यावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी भारतातील सेलिब्रेटिंना आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यानंतर आपल्या भूमिका मांडा असा सल्ला दिला आहे. संजय राऊत म्हणाले, “सेलिब्रेटींवरती देशाचं आंदोलन चालत नाही. थंडी, पावसासारख्या परिस्थितीत शेतकरी आंदोलनासाठी गाझीपूर सीमेवर बसले आहेत. त्यांच्याबद्दल या सेलिब्रेटिंनी संवेदना व्यक्त केली आहे का? भारतातील जे सेलिब्रेटी ट्विटरवरुन आज बोलत आहेत त्यांना भाजपाने एका लक्झरी बसमध्ये बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरवर नेलं पाहिजे आणि हजारो शेतकरी कोणत्या परिस्थितीत ३ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, राहत आहेत, हे दाखवायलं पाहिजे.

काही मोजके सेलिब्रेटी सोडले तर यातील एक तरी सेलिब्रेटी शेतकऱ्याच्या बाजूनं उभा राहिला आहे का? आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि मग आपल्या काय भूमिका मांडायच्या आहेत त्या मांडा. जगभरातील लोकांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. पण देशातील काही प्रमुख लोक त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत, कारण ते भीती आणि दहशतीखाली आहेत, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

News English Summary: With the exception of a few celebrities, has at least one of these celebrities sided with the farmers? Get to know the farmers first and then ask them what their role is. People all over the world are also supporting this movement. But some prominent people in the country are not ready to support them as they are under fear and intimidation, said Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut slams celebrities expressed opinion after Rihaana tweet news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x