26 April 2024 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

Nashik oxygen leak

नाशिक, २१ एप्रिल: नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने सर्वत्र हाहाकर माजला आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे अर्धा तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. याच अर्ध्या तासात तब्बल 22 जणांचा जीव एका झटक्यात गेला. यापैकी काही अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होते. तर काही रुग्णांमध्ये सुधारणा होत होत्या. काहींनी आपल्या नातेवाइकाला घरी घेऊन जाण्याची तयारी देखील केली होती. पण, अर्ध्या तासाने होत्याचे नव्हते केले.

दरम्यान, एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर;
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

 

News English Summary: This is an attack on the whole of Maharashtra. The whole of Maharashtra is in mourning over the Nashik tragedy! ” In such words, Chief Minister Uddhav Thackeray expressed his feelings. CM Uddhav Thackeray has said that he has ordered a high-level inquiry into the whole incident. He also announced Rs 5 lakh each to the heirs of the deceased.

News English Title: Nashik oxygen leak Maharashtra CM Uddhav Thackeray announced relief amount to dead patients family news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x