6 May 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

नवी दिल्ली : नवी दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना आणि विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. समाजवादी पार्टीने मोदी सरकारला मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षण प्रश्नावरुन धारेवर धरण्याचे ठरवले आहे.

परंतु नंतर विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई यांसारख्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात रान उठवले आहे. मॉब लिंचिंगप्रकरणी अधिवेशनाच्या पहिल्यादिवशीच स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संसदेचे कामकाज सुयोग्य रितीने चालणे हे देशहिताचे असल्याने केंद्र सरकार सर्व राष्ट्रीय मुद्द्यावर संसदेत खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू यांनी सुद्धा राज्यसभेतील प्रमुख नेत्यांची भेट घेत पावसाळी अधिवेशना दरम्यान केंद्र सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x