2 May 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा
x

मोदी सरकारच्या RCEP करारामुळे २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील? राष्ट्रीय किसान महासंघ

पंढरपूर : थायलंड येथे २१ जुलै रोजी RCEP अर्थात क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत ट्रेड करारावर भारताकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने पियुष गोयल हे लवकरच थायलंडला रवाना होणार आहेत. परंतु या करारामुळे देशातील २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे.

क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये तब्बल १६ देश सहभागी होत असून त्यामध्ये आयात कर शून्य ते पाच टक्के करून घेण्यावर अनेक देश आग्रही असल्याचे त्यांनी नमूद केलं. त्यामुळे न्यूझीलंड सारख्या देशातून स्वस्त दरात येणाऱ्या दूध पावडरमुळे बनविले जाणारे दूध देशात केवळ सात ते दहा रुपयांपर्यंत मिळू शकेल. तसेच खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने आणि इतर सर्व देशातून येणाऱ्या खाद्य तेलामुळे भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप अडचणीत येणार असल्याचा दावा के. व्ही. बिजू यांनी केला आहे.

आधीच देशातील ७५ हजार लिटर टन दूध हे २०,००० टॅन दूध पावडर व १५,००० टन बटर ऑइल मिसळून आले आहे आणि त्यामुळे दूध व्यावसायिक अडचणीत आला आहे. त्यात जर विद्यमान ४० टक्के आयात कर सुद्धा कमी केल्यास दूध हे फक्त सात ते दहा रुपयांना प्रति लिटर उपलब्ध होईल असं राष्ट्रीय किसान महासंघाच म्हणणं आहे.

विशेष म्हणजे मोदी सरकारवर आयात दर कमी करण्यासाठी प्रचंड दबाव असला तरी या विषयावर सरकारची नेमकी भूमिका समजू शकलेली आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील वाढत्या दबावामुळे या कराराला स्थगिती दिली होती.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x