28 April 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

गल्ली ते दिल्ली सत्तेत सामील असलेल्या सेनेची 'हेच काय अच्छे दिन?' अशी पोश्टरबाजी

मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.

मात्र गल्ली ते दिल्ली भाजपसोबत सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेने ‘हेच काय अच्छे दिन?’ अशी पोस्टरबाजी करून वाढत्या महागाई पासून स्वतःला वेगळं भासवत असल्याची चर्चा मुंबईमध्ये रंगली आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वच थरातून केंद्र सरकारवर टीका होत आहे. परंतु आम्ही केंद्रात सुद्धा भाजपबरोबर सामील आहोत याचा शिवसेनेला विसर पडल्याचे या पोश्टरबाजीतून दिसत आहे.

शहरातील इतर भागात तसेच दादर येथील शिवसेना भवनच्या समोर इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने बॅनर लावले असून यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या २०१५ च्या आणि २०१८ च्या किंमतीतील फरक दाखवला आहे. ‘हेच का अच्छे दिन’?, असं म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महागाईमुळे सामान्यांच्या मनात सरकारबद्दल रोष वाढत असून, त्या रोषातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वतःला वेगळं भासविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x