29 April 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Papaya Leaf Juice on Dengue | पपईच्या पानांचा रस 'डेंग्यू' रुग्णांसाठी फायदेशीर - नक्की वाचा

Papaya leaf juice is beneficial on dengue

मुंबई, २७ सप्टेंबर | मुंबईसह देशभरात ‘डेंग्यू’ , स्वाईन फ्ल्यू अशा आजारांनी आपलं डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतीला यावर उपाय म्हणून विविध घरगुती उपाय सुचवणारे मॅसेजेसही सोशल मिडीयातून फिरत आहे. अशांपैकी एक म्हणून ‘पपईच्या पानांमुळे डेंग्यू (Papaya Leaf Juice on Dengue) आटोक्यात राहतो’. पण ही अफवा नसून त्यात तथ्य असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. (हे ही वाचा – पपई खा आणि वजन घटवा)

How to use papaya leaves to fight dengue :

Papaya-Leaf-Juice-on-Dengue

अफवा तर नाही ना?
सोशल मिडीयात फिरणार्‍या या मॅसेजमुळे अनेकदा लोकांना ही एक अफवा वाटते. पण वास्तवात पपईची पानं आरोग्यदायी असल्याचे सिद्ध झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ़ फ्लोरिडाचे संधोधक डॉ. नॅम डॅंग यांच्यामते, पपईच्या पानांचा रस फायदेशीर आहे. या पानांमुळे कर्करोगाशी सक्षमतेने सामना करता येतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. तसेच मलेरियाशी सामना करण्याची क्षमता यामध्ये आहे. श्रीलंकन फिजिशियन डॉ. सनथ यांच्यामते कोवळ्या पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर फायदेशीर आहे. हा रिसर्च पेपर 2008 साली श्रीलंकन जर्नल ऑफ़ फॅमिली फिजिशीयन मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.

कसा आहे पपई फायदेशीर ?
पपईच्या पानांमध्ये chymopapin आणि papain अशी महत्त्त्वपूर्ण एंजाईम्स आढळतात. डॉ. सनथ यांच्या मते, या पानांमुळे रक्त साखळून न राहता प्रवाही होते. तसेच रक्तातील प्लेट्स काऊंट वाढवतात व डेंग्यूमध्ये होणारे यकृताचे नुकसान टाळून त्याची कार्यक्षमता वाढवतात.

कसा घ्याल पपईचा रस ?
* पपईची कोवळी पानं खुडून घ्यावीत. त्याचे देठ काढून फक्त पानं स्वच्छ धुवून घ्यावीत.
* खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये ही पानं वाटून त्याची पेस्ट करावी. यामिश्रणामध्ये पाणी, मीठ व साखर मिसळू नये.
* यानंतर आठ तासांच्या अंतराने हा रस दिवसातून दोनदा प्यावा.

How Papaya Leaf Juice Can Be Used To Treat Dengue And Malaria :

रसाचे प्रमाण:
* 5-12 वयोगटातील मुलांसाठी – 5मिली /दिवसातून दोनदा
* 10 वर्षांखालील मुलांसाठी – 2.5 मिली
* मध्यमावयीन लोकांसाठी – 10 मिली / दिवसातून दोनदा

कोणत्या टप्प्यावर रुग्णांनी हा रस प्यावा ?
तज्ज्ञ डॉक्टरांच्यासल्ल्यानुसार शक्य तितक्या लवकर हा रस घ्यावा. डेंग्यूची लक्षण आढळल्यास / निदान झाल्यास तुम्ही लगेचच हा रस प्यायला सुरवात करू शकता.या आजारामध्ये झपाट्याने प्लेट्स कमी होतात. त्यामुळे त्या 150000 पेक्षा कमी होण्याआधीच हा रस प्यायला सुरवात करावी. कारण या आजाराची गंभीरता वाढल्यास काही अवयव निकामी होण्याची शक्यता वाढते. मग अशावेळी उपाय फायदेशीर ठरत नाहीत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Papaya leaf juice is beneficial on dengue.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x