8 May 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु
x

Health First | टाचा दुखतात मग करा हे घरगुती उपाय । सविस्तर वाचा

home remedies for heel pain

मुंबई ३० एप्रिल : चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. मात्र अनेकांना टाचदुखी किंवा तळवे दुखीची समस्या असते. त्यामुळे अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर ही समस्या तीव्रतेने जाणवते. चालत असताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतात. शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यांमध्ये प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. या प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायू घट्ट होतात आणि टाचदुखी सुरू होते साधारणत: चाळिशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखीची समस्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं. या टाचदुखीवर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.

बर्फाचा शेक
टाचा दुखत असल्यास बर्फाने शेकवा. बर्फाच्या थंडाव्यामुळे पेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते. परिणाम दुखणाऱ्या टाचांपासून आराम मिळतो. त्यासाठी १५ मिनिटे बर्फाने शेकवा.

तेलाची मालिश
टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाची मालिश हा उत्तम उपाय आहे. यामुळे दुखण्यावर लगेचच आराम मिळतो. मसाज केल्याने मसल्स रिलॉक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी खोबरेल तेल, मोहरीचे तेल इत्यादीने टाचांना मसाज करा. दिवसातून ३ वेळा १०-१० मिनिटे मसाज केल्याने दुखण्यावर आराम मिळतो आणि सूजही कमी होते.

हळदीचा प्रयोग
हळदी औषधी आणि बहुगुणी असते. हळदीतील कर्क्युमिन तत्वामुळे दुखणे, सुज यापासून आराम मिळतो. त्यासाठी एक ग्लास दूधात अर्धा चमचा हळद घालून ५ मिनिटे मंद आचेवर गरम करा. नंतर दुधात एक चमचा मध घाला आणि प्या. टाचांचेच नाही तर शरीरातील इतर भागातील दुखण्यापासून आराम देण्यासही मदत होते.

मीठ आणि पाणी
तळवे, टाचांचे दुखणे दूर करण्यासाठी मीठाचे पाणीही उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे जाडे मीठ घाला. ते नसल्यास बारीक मीठ वापरले तरी चालेल. त्यानंतर त्या पाण्यात १५-२० मिनिटे पाय बुडवून ठेवा. दुखण्यावर आराम मिळेल. त्यानंतर साध्या पाण्याने पाय धुवा व त्यावर मॉईश्चराईजर लावा.

News English Summary: Walking is a great exercise for the body. However, many suffer from heel pain or sore feet. So many times when walking or standing up the problem is felt intensely. When walking, the weight of the body falls on the knees, feet and soles of the feet. There are some home remedies for this heel pain that can cure this problem.

News English Title: Do home remedies for heel pain news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x