19 July 2019 9:42 AM
अँप डाउनलोड

आम्हीच सत्तेत येऊ म्हणजे EVM'वर बरंच नियंत्रण दिसतंय: राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला

आम्हीच सत्तेत येऊ म्हणजे EVM’वर बरंच नियंत्रण दिसतंय: राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : निकतच राज्य सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन पार पडलं त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या अधिवेशनात ‘मी पुन्हा येईन’ असे वक्तव्य केले. मात्र त्यांच्या आत्मविश्वासाकडे पाहून एनसीपीने त्यांच्यावर बोचऱ्या शब्दात आणि व्यंगचित्र प्रसिद्ध करून टीका केली आहे. त्यांचं इव्हिएमवर बरंच नियंत्रण दिसतंय, अशी टीका एनसीपीने ट्विटरवरून केली आहे.

नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ईव्हीएम’वर अनेक वर्षांपासून संशय व्यक्त करण्यात येतो आहे आणि त्यासाठी अनेकांनी आगामी निवडणुका या बॅलेटपेपरने घ्याव्यात यासाठी आग्रह धरून, त्यासाठी आंदोलनं देखील केली आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत २१०-२३० पर्यंत जागा एनडीएला मिळतील तर भाजपाला १८०-२०० जागा मिळतील असं अनेक सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र निकालाच्या काही दिवस आधी मोदी आणि अमित शहा यांनी भाजप एकटा ३०० जागांचा पल्ला ओलांडेल हे आत्मविश्वासाने सांगितले होते आणि तसेच झाले आणि ते सुद्धा सरकारविरोधी वातावरण असताना. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती यंदा २२० चा टप्पा ओलांडेल आणि काँग्रेस आघाडीला ५० जागा देखील मिळणार नाहीत हे आत्मविश्वासाने सांगत आहेत.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या या आत्मविश्वासावर विरोधकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे विधीमंडळाचे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरु होते. दरम्यान मंगळावरी या अधिवेशनाची सांगता झाली. दरम्यान मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणात मी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत,याच ठिकाणी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर सरकारच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या बिलांवर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने मी विरोधी पक्षाचे आभार मानतो, असेही त्यांनी म्हंटले.

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून एनसीपीने जोरदार टीका केली आहे. कशाच्या जोरावर या वल्गना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, याची जनतेला पूर्ण कल्पना आहे. असे एनसीपीने म्हंटले आहे. एवढेच नव्हे तर एनसीपीने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोवर मुख्यमंत्री फडणवीस पुढे आमचीच सत्ता येईल असे म्हणताना दर्शवले आहे, तर दुसरीकडे सामान्य जनता त्यांचं इव्हिएमवर बरंच नियंत्रण दिसतंय असे म्हणताना दर्शवली आहे.

नेमकं काय ट्विट केलं आहे एनसीपीने?

त्याला भाजपने देखील उत्तर दिलं आहे.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या