महत्वाच्या बातम्या
-
फडणवीस साहेब! अशाच कामगिरीचा सल्ला मोदींच्या गुजरात भाजपला सुद्धा द्यायचा होता
काल मुंबई सांताक्रूझ येथे भव्य ‘उत्तर भारतीय स्थापना दिन’ मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युपीचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान, उपस्थित उत्तर भारतीयांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले.
6 वर्षांपूर्वी -
दरवाढीचा झटका! वीजदर प्रति युनिटमागे ५० ते ६० पैशांनी वाढणार
आधीच वीजदरवाढीमुळे हैराण असलेल्या वीजग्राहकांवर आता नव्या पर्यावरण नियमांचा भार पडणार आहे. दरम्यान, पर्यावरण रक्षणासाठी आता औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना नव्या सुसज्य यंत्रणा बसवाव्या लागणार आहेत. तसेच संबंधित प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणाऱ्या राखेच्या वाहतुकीचा बोजाही यंत्रणांवर पडणार असल्याने प्रति युनिट पन्नास ते साठ पैशांची वीजदरवाढ होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी सुद्धा इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरतील: उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांना सक्रिय राजकारणात आणण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे सुद्धा कौतुक केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
गड्याने सर्व थिएटर बुक करून, अभिजित पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' सिनेमाचा बॅनर लावला
‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि निर्माता संजय राऊत यांच्यामध्ये काही तरी वाद झाल्याचे वृत्त सुरुवातीला पसरले होते. प्रथम सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही बाजूने काहीतरी सारवासारव करण्यात येत होती. परंतु, सध्या सुरु असलेल्या ट्विटर वॉर’वरून तरी ते वाद सत्य असल्याचं समोर येऊ लागलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
संपूर्ण मनसे अभिजित पानसें'साठी आक्रमक, राऊतांकडून ट्विट डिलीट
‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर महाराष्ट्र सैनिकांसोबत मनसे पदाधिकारी सुद्धा संजय राऊतांविरोधात आक्रमक झाली आहे. परंतु हा वाद केवळ समाज माध्यमांवर मर्यादित न राहता, मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना टॉकीजबाहेर आंदोलन करत ठाकरे सिनेमाच्या पोस्टवरुन संजय राऊत यांचं नाव खोडत स्वतःचा राग व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
'ठाकरे' साकारण्याची जवाबदारी पेलणारे मेंदू आता त्यांना 'लहान झाले'? नेटकऱ्यांनी झोडपले
काल ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि निर्माता संजय राऊत यांच्यामध्ये काही तरी वाद झाल्याचे वृत्त सुरुवातीला पसरले होते. प्रथम सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही बाजूने काहीतरी सारवासारव करण्यात येत होती. परंतु, सध्या सुरु असलेल्या ट्विटर वॉर’वरून तरी ते वाद सत्य असल्याचं समोर येऊ लागलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी-डहाणू तालुक्यात आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी पहिला तर ९ वाजून १५ मिनिटांनी दुसरा भूकंपाचा धक्का लागला असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या कामाला महापौर बंगला येथे गणेशपुजनाने सुरुवात झाली. मुख्यमंत्री तसेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते यावेळी गणेशपुजन पार पडले. दरम्यान, या छोटेखानी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भारतीय जनता पक्षाच्या खासदार पुनम महाजन, मुंबईचे महानगर पालिकेचे महापौर महाडेश्वर, केंद्रीय मंत्री अनंत गिते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि समस्त उद्धव ठाकरे कुटुंबिय उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
तर...पंतप्रधानपदासाठी शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल
लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण कठीण होणार आहे. अशा राजकीय पेच निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं यांचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना जाहीर पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: पावसमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश
माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पावस जिल्हा परिषद गट टाकलेवाडी तसेच रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्रमांक २८ मधील राजीवडा मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी -
मुलाच्या प्रचारासाठी रामदास कदम ब्लँकेट व छत्र्या वाटून मतदारांना मूर्ख बनवत आहेत
दापोली, मंडणगड आणि खेड तिनही तालुक्यात पाणीप्रश्न, रस्ते आणि बेरोजगारीसोबतच इतर अनेक मोठ्या समस्या स्थानिकांना भेडसावत असताना असताना केवळ ब्लँकेट, छत्री आणि फराळ वाटून मतदारांना आमिष आणि भुलवण्याचे काम राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम करत असल्याची खरमरीत टीका एनसीपीचे आमदार संजय कदम यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये ISIS चे ९ हस्तक ATSच्या ताब्यात
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य ATS ने मुंबईलगतच्या मुंब्रा तसेच औरंगाबादमध्ये धडक कारवाई करत ISISच्या तब्बल ९ हस्तकांना ताब्यात घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडून संशयास्पद साहित्य सुद्धा आढळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, चाचपणी सुरू : सविस्तर
महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी मनसेकडून आकड्यांची चाचपणी सुरु झाली आहे. त्यानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे मोदी लाटेत सुद्धा पक्षाला मतदाराने ज्या लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद दिला होता, त्याची आकडेवारी समोर ठेऊन मतदारसंघ निश्चिती होणार आहेत. त्यामुळे मोदी लाटेत मिळालेला प्रतिसाद, मतदारसंघ आणि उमेदवार या सगळ्याचा अभ्यास आधीच युद्धपातळीवर सुरु होता असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्वाचे निर्णय
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाने शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणेकरांना सुद्धा विशेष शैक्षणिक भेट दिली आहे. कारण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय निश्चित करण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक - शिवसेनेचं 'जय उत्तर प्रदेश', यूपीत लढवणार लोकसभेच्या २५ जागा
दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सामील असलेली शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी असतात. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशातलं सर्वात मोठं तसेच अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेल्या यूपीत इतर स्थानिक मित्र पक्षांसह लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या कानावर आलं आहे. त्यासंबंधित लवकरच अधिकृत घोषणा शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा: धनंजय मुंडे
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत EVM हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या धक्कादायक दाव्यामुळे देशातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी रॉ किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, अशी मागणी एनसीपीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दुर्दैव! हवेतल्या नेत्यांचे जमिनीवर भव्य इमले, तर जमिनीवरील नेत्याचे भूमिगत स्मारक?
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आणि त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीला शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी गणेशपूजन होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा समारंभ लहान स्वरूपात होणार असल्याने दिल्लीतुन कोणालाही निमंत्रण आणेल. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास विशेष उपस्थित राहतील, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं कर्तव्यावरील पोलिसाला चिरडलं
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं थेट कर्तव्यावरील पोलीस शिपायाला चिरडून मारल्याची धक्कादायक घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी २ व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा म्हणजे ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे राज्यात तस्करांच्या वाढत्या मुजोरीचं वास्तव समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
विशेष रिपोर्ट- प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ही सेम असतं! सर्वकाही ठरवून?
आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. परंतु, भाजप आणि शिवसेनेतील सर्व घडामोडींवर बारीक नजर टाकल्यास सर्वकाही २०१४ मधील लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठरवून सुरु आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे याच २०१४ मधील राजकीय रणनीतीप्रमाणे भाजप आणि शिवसेनेने निवडणुका लढवल्या होत्या आणि प्रसार माध्यमांना एकप्रकारे स्वतःवर केंद्रित करून अप्रत्यक्षरीत्या गंडवले होते, असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई मॅरेथॉनने नाकारलं, त्याच ज्युनिअर मिल्खासिंग साईश्वर या मराठी धावपटूला देशभरातील मॅरेथॉनमध्ये वाईल्ड-कार्डने आमंत्रण
वयाच्या सातव्या वर्षीच देशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून केवळ देशातच नव्हे तर परदेशी स्पर्धकांवर सुद्धा साईश्वरने छाप पाडली आहे. अल्पावधीतच साईश्वर गुंटूक’ला लोकं ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ या नावाने ओळखू लागले. मूळचा सोलापूरचा असलेला साईश्वर केशव गुंटूकचे सातव्या वर्षातील विक्रम बघितल्यावर थक्क व्हाल असच त्याच कर्तृत्व आहे. एकदा सहज म्हणून फिरायला कोल्हापूरला आला आणि धावण्याची हौस म्हणून पहिल्यांदा त्याने कोल्हापूर येथील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा त्याने सहज खिशात टाकली. परंतु तिथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील हिल मॅरेथॉन ही अवघड स्पर्धा जिंकली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON