महत्वाच्या बातम्या
-
न्यायालयाने फटकारलं, युतीच्या राज्यात सामन्यांच्या आरोग्याशी खेळ? वजन वाढण्यासाठी कोंबड्यांना इंजेक्शन
आधीच महागाईने रोज लागण्याऱ्या भाज्यांचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत. त्यात आता अजून एक गंभीर बाब उघड झाली आहे, जी सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. कारण बाजारातून तुम्ही ज्या कोंबड्या चिकनचा बेत आखण्यासाठी विकत घेऊन येता, त्या कोबंड्यांचं वजन वाढवण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जात असल्याचे समोर आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयातील एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही गंभीर बाब उघड झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
निर्णय सरकारचा आहे, त्यामुळे सरकारने सरकारसारखं प्लास्टिक बंदीच्या उपाय योजनांवर बोलावं, नात्यांवर नाही: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सरकार काय उपाययोजना आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणार आहे यावर बोलावं. प्लास्टिक बंदीचा निर्णय नात्याशी जोडू नये असं उत्तर देत रामदास कदमांना त्यांची जागा दाखवून दिली.
7 वर्षांपूर्वी -
चर्चांना उधाण, कृष्णकुंजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि राज ठाकरेंची भेट
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटी मागे सदिच्छा भेट असल्याचे कारण देण्यात असले तरी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने काही चाचपणी सुद्धा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येते.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर, आणीबाणीविषयी काय भाष्य करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून ते आज आणीबाणीविषयी काय भाष्य करणार याकडेच प्रसार माध्यमांचं लक्ष आहे. नरेंद्र मोदी आज एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेसमेंट बॅंकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पावर स्वाक्षऱ्या, निसर्गप्रेमी कोकणी लोकांमध्ये सेना-भाजप सरकार विरुद्ध संतापाची लाट येण्याची शक्यता
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध आहे. परंतु कोकणी माणसाचा तीव्र विरोध डावलून हुकूमशाही पद्धतीने हा प्रकल्प अखेर कोकणावर लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे कोकणात विद्यमान आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री असताना सुद्धा या प्रकल्पाच्या करारावर दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
प्लास्टिक आडून, राज ठाकरेंना चुचकारून २०१४ सारखी व्यूहरचना आखली जात आहे? सविस्तर
रामदास कदमांची आजची प्लास्टिक बंदीच्या विषयाला विसंगत प्रतिकिया पाहिल्यास प्लास्टिक आडून राज ठाकरें विरुद्ध २०१४ सारखी फलदायी ठरलेली व्यूहरचना आखली जात आहे. रामदास कदमांची वक्तव्य पाहिल्यास त्यामागील बोलविते धनी दुसरेच कोणी असल्याचा अंदाज येतो. शिवतीर्थावरील सभेपासून ते इतर सर्वच ठिकाणी राज ठाकरे भाजपला लक्ष करत आहेत. तसेच शिवसेनेला ते पूर्ण पणे दुर्लक्षित करत असल्यामुळे सेनेच्या अडचणी वाढत होत्या.
7 वर्षांपूर्वी -
ही विसंगत प्रतिक्रिया की विनोद? काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते? रामदास कदम
दोन दिवसांपूर्वी लागू झालेल्या प्लास्टिक बंदीच इतरांप्रमाणे मनसेने सुद्धा समर्थन केलं, परंतु प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था आणि दंडाची रक्कम अशा त्रुटींवर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्याला अनुसरून पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी ही विसंगत प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पावसाने मुंबईची 'तुंबई' झाल्यावर सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर दोषारोप
मुंबई शहरातील पहिल्याच पावसाने जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते सुद्धा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा उडाला आहे. त्यातच जवाबदारी घेण्याऐवजी मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दोषारोप करण्यात गुंतले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव स्वबळावर लढतील, तर स्पष्ट भूमिका हे राज यांच वैशिष्ट आहे: शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. मुलाखती दरम्यान पवारांनी भाजप विरोधातील महाआघाडी, शिवसेनेचा स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई वडाळ्यात दोस्ती पार्क येथे पावसाने रस्ता खचून वाहनांचे नुकसान
मुंबई शहरात काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक नैसर्गिक धक्के बसायला सुरुवात झाली आहे. तसाच प्रकार वडाळ्यातील अँटॉप हिल येथे संरक्षक भिंत खचल्याने मोठं नुकसान झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद, राज्यभर दमदार पाऊस
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २३१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान
आज मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळ जवळ ७० हजार इतकी मतदार निंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यंदा चौरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने मुंबईकरांना दाखवलेलं रेसकोर्सवरील थिमपार्कच स्वप्नं ठरणार मृगजळ?
मुंबईमध्ये कफपरेड मधील अरबी समुद्रात जवळजवळ ३०० एकर इतक्या प्रचंड जागेवर भरणा टाकून सेंट्रलपार्क उभारणारले जाणार असून, त्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपकडून मजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेतील विरोधकांचा विरोध डावलून तो मंजूर करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाबाबत चिडीचूप असणारे शिवसैनिक, आज इतरांना पर्यावरण व प्रदूषणाचे धडे का देत आहेत? सविस्तर
काल संपूर्ण महाराष्ट्रात प्लस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. वास्तविक प्लास्टिक बंदीला कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतलेला नाही. निसर्गाला आणि प्रभूषणाला विशेष करून जल प्रदूषणाला कारणीभूत असणारा सर्वाधिक मोठा घटक म्हणजे प्लास्टिक हाच आहे. प्लास्टिकचा अतिवापर आणि त्यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्था ही आपल्याकडे उपलब्ध तरी होती का हा प्रश्नच आहे. पण एक विषय प्रकर्षाने समोर आला तो म्हणजे निसर्गरम्य कोकणातील विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आणि त्या प्रकल्पामुळे भविष्यात कोकणातील समुद्र, नद्या, शेतजमीन, जल संपत्तीवर कोणते दूरगामी परिणाम होतील या बद्दल कोणतीही वाच्यता न करणारे शिवसैनिक आज संपूर्ण महाराष्ट्राला समाज माध्यमांवर निसर्ग आणि पर्यावरणाचे धडे देत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य माणूस ५००० रुपये दंड कसा भरणार? - अविनाश जाधव मनसे
सर्वसामान्य माणूस ५००० रुपये दंड कसा भरणार? – अविनाश जाधव मनसे
7 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिकबंदी झाली पण खड्डेयुक्त रस्त्यांचे काय? - नितेश राणेंचा संतप्त सवाल
प्लॅस्टिकबंदी झाली पण खड्डेयुक्त रस्त्यांचे काय? – नितेश राणेंचा संतप्त सवाल
7 वर्षांपूर्वी -
पर्यायी व्यवस्थेशिवाय आजपासून प्लास्टिक बंदी लागू, दंड ५००० रुपये
प्लास्टिक बंदी ही निसर्गासाठी चांगली आहे यात काडीमात्र शंका नाही. परंतु सरकारकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता आणि तब्बल ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या देशात मोठं मोठे दंड आकारून एखाद्या गोष्टीवर बंदी आणण्याच्या अनेक योजना अंमलात आणल्या ज्या कालांतराने अपयशी ठरल्या हा इतिहास आहे.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! शिवसेनेतील तरुण आमदारांचा गट फुटीच्या उंबरठ्यावर?
शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्वबळाचा नारा दिला खरा पण उद्या हाच नारा शिवसेना पक्ष फुटीला कारणीभूत ठरू शकतो अशा राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेत तरुण आमदार आणि वरिष्ठ आमदार असे दोन गट पडले असून मातोश्रीवर वरिष्ठ आमदारांचा दबदबा असल्याने तरुण आमदारांचा मोठा गट नाराज असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
भिवंडीत शिवसेनेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश
भिवंडीमध्ये शिवसेनेला मनसेकडून खिंडार पाडण्यात आलं असून शहरातील प्रमुख आणि तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवास्थानी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यावेळी राज ठाकरेंच्या व्यतिरिक्त मनसेचे नेते राजू पाटील हे देखील उपस्थित होते.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही सत्तेत सामील आहात, याची आठवण मतदारच शिवसेनेला २०१९ मध्ये करून देतील? सविस्तर
भारतीय लोकशाहीत सामान्य मतदार हा मतदान करतो ते संबंधित पक्षाने जाहीरपणे दिलेल्या विकास कामांवर आणि विविध आश्वासनांवर विश्वास ठेऊन. त्यानंतर निवडून आलेल्या पक्षाने सत्ता स्थापन करून त्या दिलेल्या आश्वासनांची आणि विकासकामांची पूर्तता करायची असते आणि जनतेने देशावर व राज्याच्या विकासाठी सोपविलेली ५ वर्षांची जवाबदारी खर्ची घालायची असते.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON