महत्वाच्या बातम्या
-
मोदींचं अरुण गोयल यांच्या फेक अकाउंटला उत्तर; कोरोनाविरुद्ध लढ्याला शक्ती मिळाली
लॉकडाऊनमुळे अरुण गोविल यांची प्रमुख भूमिका असलेली ‘रामायण’ टीव्ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित केली जातं आहे. त्यामुळे लोकांना टीव्हीवर पुन्हा एकदा भगवान राम पाहायला मिळत आहेत. या मालिकेला आजही मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अरुण गोविल देखील भारावून गेले आहेत. मात्र अरुण गोविल यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे समाज माध्यमांवर त्यांच्या नावाने फेक अकाउंट देखील उघडण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर जो प्रकार घडला आहे त्यातून हसावं की रडावं असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जागतिक आरोग्य संघटनेचं चीनकडे जास्तच लक्ष; तुमचा निधी रोखू; धमकीसत्र सुरूच
जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील परिस्थिती सुद्धा दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांता दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा आरोप आहे. अमेरिकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्यात येणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोयीनुसार राजकीय मैत्री आणि राष्ट्रीय गरजेनुसार धमकी; अनोखी आंतरराष्ट्रीय मैत्री
कोरोनाच्या संकटाने महासत्ता असलेल्या अमेरिकेचे सध्या कंबरडे मोडले आहे. यासाठीच अमेरिकेने भारताकडे मदत मागितली होती. ही मदत मागितल्यानंतर २४ तासांच्या आत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला धमकीही दिली होती. आता त्याच पंतप्रधान नरेंद मोदींचं कौतुक ट्रम्प यांनी केलं आहे. भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध देण्याची तयारी दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी मोदी महान असल्याचे मत व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
साथीचे रोग रोखण्यासाठी UN'मध्ये वन्यजीव बाजारपेठेवर जागतिक बंदीची मागणी
चीनमधले वुहान शहर म्हणजे कोरोनाचे केंद्रस्थान झाले होते. तब्बल ३ महिने वुहान शहर कोरोनाशी दोनहात करत होता. वुहान हे कोरोनाचे केंद्र आहे आणि या शहरात या विषाणूमुळे तब्बल ३३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये ८२ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. ताज्या सरकारी आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या काही आठवड्यांत शहरातील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत. मंगळवारी (७ एप्रिल) रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत कोरोनाचे एकही प्रकरण समोर आले नाही. त्यामुळेच सरकारने लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचं उगमस्थान; ७६ दिवसांनी वुहानचा 'लॉक' उघडणार
चीनमधले वुहान शहर म्हणजे कोरोनाचे केंद्रस्थान झाले होते. तब्बल ३ महिने वुहान शहर कोरोनाशी दोनहात करत होता. वुहान हे कोरोनाचे केंद्र आहे आणि या शहरात या विषाणूमुळे तब्बल ३३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये ८२ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. ताज्या सरकारी आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या काही आठवड्यांत शहरातील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत. मंगळवारी (७ एप्रिल) रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत कोरोनाचे एकही प्रकरण समोर आले नाही. त्यामुळेच सरकारने लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा १००० पार; एकूण संख्या १०१८वर
करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असली तरी, या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं आता करोनाबाधितांचा आकडा १०१८वर गेला आहे. मुंबईत ११६ नवे रुग्ण सापडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन उठवण्याबाबत तेव्हाची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेऊ: मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे सहभागी होते. मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲड. अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्यांतून या बैठकीत सहभागी झाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, CII सर्वेक्षण
कोरोना व्हायरस जागातील १७५हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचे ५,२९,६१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर १२१४५४ इतके रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाने जगातील मृतांचा आकडा २३७१४ पर्यंत गेला आहे. भारतात हा आकडा ४,४२१वर गेला आहे. तर १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसमुळे जगभरातील आर्थिक उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. यामुळे बाजारांना उभारी देण्यासाठी २५०० अब्ज डॉलरची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. हा आकडा कमी आहे. आतापर्यंत ८० हून अधिक देशांनी IMF’कडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काम करताना किंचाळण्याची गरज नसते; मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विरोधकांना टोला
देशामध्ये महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटाशी लढा देण्यासाठी अनेक तातडीची पावले उचलताना तितकेच कठोर निर्णयही घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच नेतृत्वकौशल्याचे कौतुक करत आमदार रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधी परदेश दौरे आणि जाहिराती बंद करा! सोनिया गांधींकडून मोदींना खरमरीत सूचना
कोरोनाच्या महामहारीशी लढण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व खासदार आणि सर्व राज्यपालांच्या मानधनात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना पत्र पाठवून त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देतानाच चार खरमरीत खडे बोल सुनावले आहेत. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, आधी स्वतःचे उदात्तीकरण करणाऱ्या टीव्हीवरच्या आणि वर्तमानपत्रातील तसेच इतर सोशल मीडियावरील हजारो कोटींच्या जाहिराती थांबवा आणि परदेश दौरे बंद करा.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे WhatsApp ची मोठी घोषणा, हे बदल केले
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात सोशल मीडियावरही अफवा आणि खोट्या बातम्यांचं पीक आलं आहे. अशा अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी आता व्हॉट्सऍपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍपने फॉरवर्ड मेसेज पाठवण्यावर निर्बंध आणले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनः MPSC स्पर्धा परीक्षा काही काळासाठी पुन्हा स्थगित
राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
किती मदत दिली तरी रडतात; न्यूयॉर्क'वर ट्रम्प संतापले; दाजींच्या विधानाची आठवण
कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपत्ती भारतात सुद्धा, त्यामुळे इंडिया फर्स्ट; ट्रम्प यांना राहुल गांधींचे प्रत्युत्तर
कोरोना विषाणूच्या संक्रमणामध्ये केंद्र सरकारने मंगळवारी जीवरक्षक म्हणून समजल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल या दोन औषधांवरील निर्यात बंदी काही प्रमाणात उठविली. त्यानंतर लगेचच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे.राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रत्युत्तराची भाषा वापरणे ही मैत्री नाही. ज्या देशांना सध्या गरज आहे त्यांना भारताने मदत केली पाहिजे. पण त्याचवेळी सध्याच्या स्थितीत जीवरक्षक ठरलेली औषधे भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजेत.
5 वर्षांपूर्वी -
हनुमानासारखं पर्वत आणायला जाऊ नका; अजित पवारांचं आवाहन
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाच्या वाटेतील मोठा अडथळा झाल्यामुळे आता मंत्रीमंडाळील प्रत्येक व्यक्ती आपल्या परिने नागरिकांना त्यांच्या घरातच थांबण्याचं आवाहन करत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने जनतेला दिलासा आणि धीर देत आहेत. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा त्यांचं कर्तव्य बजावत वेळोवेळी नागरिकांना घरातच राहण्याचा इशारा देत आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण: केंद्रीय आरोग्य मंत्रालय
देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात संक्रमित लोक सहभागी झाल्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ओळख पटली आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत जमातमधील लोकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५ हजार 500 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती खालावल्याने आयसीयूत
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सध्या करोनाशी लढा देत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना लागण झाल्याचं समोर आलं होतं. स्वतःच विलगीकरण केल्यानंतरही जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं सोमवारी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जॉन्सन यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधांच्या पुरवठ्यावरून ट्रम्प यांचा भारताला इशारा
अमेरिकेत कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी भारताकडून औषध पुरवण्याची अपेक्षा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘जर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा केला नाही तर अमेरिका जशास तसे उत्तर देईल.’
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याजवळच्या चहावाल्याला कोरोना
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेने सोमवारी खळबळ उडविली. त्या चहा विक्रेत्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून तो रस्ता बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आयर्लंडचो पंतप्रधान आणि कोकणचो झील लिओ वराडकर; डॉक्टरच्या भूमिकेतून रुग्णसेवेत
सध्या जगभरात करोनामुळे मृत्यूंचे तांडव सुरु आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटेन आणि फ्रांस सारखे प्रगत देश देखी होरपळून निघाले आहेत. जगातील सर्वोत्तम आरोग्ययंत्रणा असताना देखील हे देश हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत तर लाखाच्या घरात मृत्यू होण्याचा अंदाज सरकारी पातळीवरच व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL