26 April 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा
x

आज भारतीय रुपया आशियातील सर्वात कमजोर चलन; बघा मोदी २०१२ मध्ये काय बोलले होते?

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सुरू झालेली घसरण अजूनही सुरूच आहे. आज सुद्धा डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी भारतीय रुपयाच्या तुलनेत एका डॉलरची किंमत तब्बल ७३.६० रुपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारात नकारात्मक परिणाम उमटत आहेत. सेन्सेक्समध्ये तब्बल ५८० अंकांनी घसरण झाली आहे.

काल बुधवारी एका डॉलरची किंमत ७३.३ रुपये इतकी होती. सोमवारी एका डॉलरची किंमत ७२.९१ एवढी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने रुपयाची घसरण होत आहे. त्याशिवाय एमर्जिंग इकॉनॉमिजसमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचाही रुपयावर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.

आज मोदी सरकारच्या काळात रुपयांनी जो निच्चांक गाठला आहे त्याला आंतराष्ट्रीय कारण देणारे मोदी सरकार याच रुपयाच्या घसरणीवर तेव्हा काँग्रेसच्या भष्टाचारामुळे तो घसरत आहे असं कारण दिल होत. पण आमचा सरकार भष्टाचारमुक्त असल्याचं सांगणारे मोदी आज या रुपयाच्या घसरणीच काय कारण देतील? भारतीय रुपया आशियातील सर्वात कमजोर चलन झालं आहे.

काय म्हटलं होत मोदींनीं २०१२ मध्ये काँग्रेस राजवटीत रुपयाच्या घसरणीवर नेमक?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x