29 April 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

नावं बदलून देश संपन्न होत असेल, तर १२५ कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा

लखनऊ: भारतातील महत्वाचे आणि ज्वलंत मुद्यांपासून सामान्यांना विचलित करण्यासाठीच जिल्हे आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव मोदी सरकारकडून सुरू आहे, अशा तिखट शब्दांत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच CBI मधील अंतर्गत वाद, राफेल लढाऊ विमान घोटाळा आणि RBI ची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या आपल्या देशासमोर आहेत. परंतु, केवळ या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून पुढे रेटला जात आहे असं हार्दिक पटेल यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांमध्ये हार्दिक यांनी भारतीय जनता पक्षावर आणि नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. फक्त निरनिराळ्या जागांची नावं बदलून देश सर्वबाजूंनी संपन्न होणार असेल, तर १२५ कोटी भारतीयांचं नाव बदलून आता राम ठेवा, असा सणसणीत टोला सुद्धा त्यांनी भाजपाला लगावला.

यूपीतील योगी सरकारनं काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद आणि फैजाबादचं नामांतर केलं. त्यानुसार अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारनं अधिकृत मंजुरी दिली आहे. नेमका याच मुद्याला धरून हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. केवळ मुलभूत प्रश्नांपासून सामान्यांचं लक्ष विचलित व्हावं, यासाठी सरकार नामांतराचा खटाटोप करत आहे.

हॅशटॅग्स

#Hardik Patel(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x