27 April 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

भाजपकडून महिलांचा अपमान! शबरीमलात महिलांचा प्रवेश ही विनाशकारी घटना म्हटलं

केरळ: शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात आज २ महिलांनी प्रवेश करून दर्शन घेतल्याची घटना ही विनाशकारक असल्याचं भाजपकडून वक्तव्य केलं आहे. आज पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या महिलांनी शबरीमलामध्ये कडेकोट पोलिसांच्या गराड्यात मंदिरात प्रवेश केला आणि शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली.

सुप्रीम कोर्टाने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिल्यानंतर सुद्धा प्रचंड विरोधाचा सामना मंदिरात जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना करावा लागला होता. त्यानंतर महिलांच्या अनेक समाजसेवी संस्थांनी सुद्धा प्रवेशाचे प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यश आले नव्हते. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आदेश पाळण्याची ग्वाही दिली आणि महिला भाविकांना पुरेपूर बंदोबस्त देण्याचे सुद्धा मान्य केले होते.

मात्र या निर्णयाच्या अमलबजावणीस भक्तांकडून आणि स्थानिकांकडून प्रचंड विरोध झाल्यामुळे अद्याप महिलांनी मंदिर प्रवेश केला नव्हता. परंतु, आज पहाटे २ महिलांनी परंपरा मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला स्वतः केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. परंतु, संतापजनक म्हणजे, भाजपाचे माहिती व तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी ही घटना खरी असेल तर ती विनाशकारी असल्याचे ट्विट केले आहे. याआधीही भाजपाच्या केरळमधल्या नेत्यांनी परंपरा मोडण्यास विरोध केला होता.

त्यामुळे महिलांबाबत भाजपची विचार करण्याची मानसिकता यावरून स्पष्ट होते आहे असं विरोधकांनी म्हटलं आहे. यावरून भाजपवर चारही बाजूने टीका होण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x