26 April 2024 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

VIDEO : महिलांचा अपमान! शबरीमला महिलांच्या प्रवेशाला भाजपने हिंदूंवर बलात्कार म्हटले

केरळ : शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी अतिशय वादग्रस्त विधान केले आहे. केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे सांगतानाच हा हिंदूंवर दिवसाढवळ्या झालेला बलात्कारच आहे, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शबरीमला मंदिर प्रवेशबंदीची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत बुधवारी पहाटे २ महिलांनी पोलीस संरक्षणात अयप्पाचे दर्शन घेतले होते. दहा ते पन्नाशीच्या वयोगटातील महिलांवरील शबरीमला प्रवेशबंदी उठवण्याच्या सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णयानंतर आणि अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्या दोन महिलांनी हे धाडसी पाऊल उचललं होतं आणि इतिहास रचला होता. परंतु, स्त्रियांना न्यायव्यवस्थेने दिलेला हा हक्क पचनी पडलेला दिसत नाही.

या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी या घटनेवरून एक वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री हेगडे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने शबरीमला मंदिरात सर्ववयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यानुसार केरळमधील डाव्या विचारधारेच्या सरकारने समाजभावनेचा विचार करणे अपेक्षित होते. परंतु, हा तर दिवसाढवळ्या हिंदूंवर झालेला बलात्कारच आहे, असे धक्कादायक विधान त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हटलं केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x