8 May 2024 4:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Viral Video | मगरीची पाण्यात ड्रोनने शूटिंग सुरु होती, तितक्यात मगरीने वरच्या दिशेने झेप घेत ड्रॉनवर केला हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सध्या अनेक तरुणांना वाइल्डलाइफ फोटोग्राफीचे वेध लागले आहे. यात अनेक जण छान फोटोग्राफीसाठी खुप मेहनत करतात. अशात मगर किती भयानक असते हे तुम्हाला माहितच असेल. ती शिकार पाहील्यापाहील्या त्यावर हल्ला करते. मात्र यात अनेकदा मगरीच्या तोंडाला दुखापत होते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यात एक मगर पाण्यात पोहत आहे. तसेच ती तिच्या शिकारीच्या शोधात असते. अशात काही मुलं वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी पाण्यात ड्रोन कॅमेरा फिरवत असतात. अचानक त्या मगरीची नजर ड्रोन कॅमे-यावर पडते. तिला हा ड्रोन कोणतातरी पक्षी आहे असे वाटते. त्यानंतर जे घडते ते पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल.

मगरीला हा ड्रोन कॅमेरा एक पक्षी आहे असे वाटते. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी ती त्याच्यावर मोठी झडप घालते. अशात तिची मोठी फजीती होते. कारण ड्रोन कॅमेरा असल्याने मगरीला पाहून ती मुलं तो कॅमेरा लगेचच वर घेतात. त्यामुळे मगरीच्या तोंडाला काहीच लागत नाही.

मात्र यात मगरीने घेतलेली झेप बघण्यासारखी आहे. आपले शिकार पकडण्यासाठी मगर चक्क हवेत जोरात झेप घेते. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की तिचे आर्धे शरिर हवेत तरंगत असते. हा व्हिडीओ एका व्यक्तीने ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. मगरीचा हा खतरणाक आणि हसू येइल असा व्हिडीओ आता सोशल मीडिय़ावर खुप व्हायरल होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video crocodiles jumped vertically in the air to attack drone video trending check details 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x