12 May 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

डोंबिवली स्थानकावरील जीर्ण पूल पादचाऱ्यांसाठी आजपासून ‘बंद’

Dombivali, Thane, Bridge Collapse

कल्याण : मुंबईतील ‘हिमालय पूल’ दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने अखेर डोंबिवलीत धोकादायक पादचारी पुलावर हातोडा मारण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित पूल हा अंदाजे ३० ते ३५ वर्ष जुना असलेला हा पूल अतिशय जीर्ण झालेला असून ठिकठिकाणी पुलाची अवस्था जर्जर झाली आहे. दरम्यान, हा पूल पडण्यासाठी आज मध्य रेल्वेवर साडेपाच तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार असून त्याजागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल तोडून त्याजागी नव्याने पूल बांधण्याच्या निर्णयासह गणेश मंदिराकडील पादचारी पूलदेखील शुक्रवारपासून रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी बंद केला आहे. गेल्या वर्षभरापासून हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता, मात्र तरीही या पुलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं नाही. मात्र सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर गेल्या रविवारपासून या पूलाचं तोडकाम करण्यास सुरूवात केली.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x