8 May 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल
x

Supriya Sule | अजित पवार हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात, सुप्रिया सुळे यांचे संकेत

Highlights:

  • Supriya Sule
  • सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टींग करणार?
  • अजित पवार काय म्हणाले होते?
Supriya Sule

Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय पारा चढण्याची शक्यता आहे. अजित पवार हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांना डावलण्यात आल्याचा ही त्यांनी इन्कार केला आहे. महाविकास आघाडीचे सदस्य पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करत असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टींग करणार?

राष्ट्रीय स्तरावर मी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना रिपोर्टींग करणार. तर राज्यात मी अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना रिपोर्टींग करणार आहे. अजित पवारांकडे दुर्लक्ष झाले यामध्ये अजिबात तथ्य नाही. ते राज्याचे विरोधी पक्षनेते असून ते पद मुख्यमंत्रिपदाच्या समकक्ष आहे. राष्ट्रवादीत बदल झाल्यानंतर अजित पवार नाराज असण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

‘१९९१ मध्ये मी सहा महिने खासदार होतो आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची पद्धत पाहिली आहे. त्या अनुभवाच्या आधारे मी राज्यस्तरावर काम करण्याचा निर्णय घेतला आणि तीन दशके महाराष्ट्रात कार्यरत आहे. माझी काम करण्याची पद्धत राष्ट्रीय स्तरासाठी चांगली नाही, याची मला जाणीव आहे. मला पक्षात कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही, ही बातमी चुकीची आहे. मी राज्यात विरोधी पक्षनेता आहे आणि ही मोठी जबाबदारी आहे.

त्याचबरोबर शनिवारची बैठक घाईघाईने सोडल्याच्या वृत्ताबाबतही अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिला आहे. पुण्याला जाण्यासाठी पूर्वनियोजित उड्डाणामुळे हे करण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, नेतृत्वावरून कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये म्हणून पक्षाने अजित दादांच्या हाती राज्यस्तरीय नियंत्रण देण्याची व्यवस्था केल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे.

News Title : Supriya Sule talked on Ajit Pawar check details on 12 June 2023.

हॅशटॅग्स

#Supriya Sule(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x