11 May 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा
x

INDIA आघाडी भूकंप करणार! बिहारमध्ये जेडीयू फुटीच्या उंबठ्यावर, 45 पैकी 30 आमदार बैठकीला गैरहजर, वेगळा गट स्थापन होणार?

CM Nitish Kumar

Bihar Politics Crisis | बिहारमध्ये बहुमत चाचणीपूर्वी पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या अनौपचारिक बैठकीला अनेक आमदार पोहोचले नाहीत. मुख्यमंत्री नितीशकुमार केवळ १५ मिनिटे या बैठकीत होते, त्यानंतर ते तडकाफडकी निघून गेले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा बाजार तापला आहे.

शनिवारी दुपारी मंत्री श्रवणकुमार यांच्या निवासस्थानी JDU आमदारांसाठी दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात ४५ पैकी केवळ १५ आमदार उपस्थित होते. बिहार विधानसभेत जेडीयूच्या आमदारांची संख्या ४५ आहे. मात्र आता जेडीयू नेते उडवाउडवीची उत्तरं देताहेत. तर दुसरीकडे राजदचे नेते आणि काँग्रेस नेते सातत्याने राजकीय खेला होणार असल्याचा दावा करत आहेत.

विशेष म्हणजे भाजपचे आमदारही RJD च्या संपर्कात असल्याने भाजप वरिष्ठांना JDU पेक्षा स्वतःचे आमदार राखण्याची चिंता सतावत असल्याचं वृत्त आहे. पाटण्यातील मंत्री श्रवण कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयू आमदारांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी मैदानातील कृषी मेळाव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार ही मंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण तोपर्यंत पक्षाचे सर्व आमदार आले नव्हते. मुख्यमंत्री नितीश यांनी श्रवण कुमार यांच्या निवासस्थानी सुमारे १५ मिनिटे मुक्काम केला आणि नंतर तेथून निघून गेले. त्यानंतर आमदारांची कमी संख्या पाहून नितीश संतापले आणि त्यांनी निवासस्थान सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहार विधानसभेत जेडीयूच्या आमदारांची संख्या ४५ आहे. मंत्री श्रवणकुमार यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आमदारांची संख्या १५ होती. या बैठकीला डॉ. संजीव, बिमा भारती, अमन कुमार, गोपाल मंडल, शालिनी मिश्रा, गुंजेश साह, सुदर्शन आणि दिलीप राय असे मोठे नेते सुद्धा उपस्थित नव्हते.

आता रविवारी शिक्षणमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्या निवासस्थानी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला बिहार विधानसभेत नितीश सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये JDU आणि नितीश कुमार राजकीय दृष्ट्या संपावी अशी भाजपाची देखील इच्छा होती. पण JDU फोडताना खरा खेला तो इंडिया आघाडीने आणि सगळं गेम पलटला आहे.

News Title : CM Nitish Kumar left JDU Party meeting within 15 minutes check details 10 February 2024.

हॅशटॅग्स

#CM Nitish Kumar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x