2 May 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

१० हजारांहून अधिक रकमेसाठी ATM मागणार ओटीपी

ATM, Amount Withdrawal, OTP, Ten Thousand

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर आता एटीएमचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे. कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ओटीपी बंधनकारक केला आहे. म्हणजेच एटीएममधून तुम्हाला दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर पासवर्डसोबत ओटीपी क्रमांकही द्यावा सूत्रांनुसार, आता अन्य बँकादेखील कॅनरा बँकेप्रमाणेच हा ओटीपीचा नियम करण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या निर्देशांचे सर्व बँकांना पालन करायचे आहे. आरबीआयने हे स्पष्ट सांगितले आहे की एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखायला हवी. एटीएम फसवणुकीचे प्रकार रात्री ११ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक होतात. एटीएममधून फसवणुकीचे प्रकार हे रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान अधिक होतात. रिझर्व्ह बँकेच्या सर्व आदेशांचे आम्हाला पालन करावे लागणार आहे. तसेच एटीएममधून होणारे फसवणुकीचे प्रकार थांबवावे असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केल्याची माहिती,” स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

यापूर्वी एटीएममधील फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी दिल्ली स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने (SLBC) काही उपाय सुचवले होते. त्यांनी एटीएमच्या दोन ट्रान्झॅक्शनदरम्यानचा कालावधी हा ६ ते १२ तासांचा असावा, असा पर्याय सुचवण्यात आला होता. २०१८-१९ मध्ये दिल्लीत एटीएममधून फसवणुकीची १७९ प्रकरणे समोर आली होती. तर महाराष्ट्रातूनही २३३ प्रकरणं समोर आली होती. काही महिन्यांपूर्वी एटीएम कार्डच्या क्लोनिंगचीही प्रकरणे समोर आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांचा समावेश होता. गेल्या वर्षात देशभरात फसवणुकीच्या प्रकारत वाढ होऊन ९८० प्रकरणे समोर आली होती. त्यापूर्वी एटीएमद्वारे फसवणुकीची ९११ प्रकरणे उघड झाली होती.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x