7 May 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा
x

मोदी यांच्या रूपाने देशाला नेता सापडला आहे: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray, PM Narendra Modi, Shivsena, BJP

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.

महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान ठाकरे यांनी येणारं सरकार युतीचं येणार आहे, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांनी जोराने टाळ्या वाजवल्या. यावेळी ठाकरे म्हणाले की, जे करायचं ते खुलेपणाने, दिलखुलासपणे करायचं आहे. आम्हाला सत्ता हवी आहे, सत्तेची हाव नाही. राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे.

येणार तर युतीचंच सरकार येणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

“राज्यात युतीचंच सरकार येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, मात्र राज्याचा विकास कऱण्यासाठी सत्ता हवी आहे. एक चांगलं आणि मजबूत सरकार राज्यात येणार आहे,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ‘मोदीजी, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधाल हा विश्वास आहे. समान नागरी कायदा देखील तुम्ही आणाल हा विश्वास. ३७७ रद्द झालं; याचा अभिमान आहे. काश्मीर हा आपला अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. मोदी यांच्या रूपाने नेता सापडला आहे. मुंबईला सुविधा देत आहात याचा आनंद आहे. राज्यात युतीचे सरकार येणार. सत्तेचा हव्यास नाही. विकास करण्यासाठी सत्ता हवी’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x