8 May 2024 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

सावधान! राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain, Monsoon

मुंबई, १ जून: मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता, त्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. मात्र काल मध्यरात्री मुंबईत कोसळलेल्या पहिल्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहेत. परंतु भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून या भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट भागात अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्ट भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.

त्याचबरोबर दुसरीकडे १ जूनलाही काही भागांमध्ये वाऱ्यासह रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढच्या १२ तासात पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतरच्या २४ तासात पूर्वोत्तर अरबी समुद्रावर त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ सुरुवातीला २ जूनला पहाटे उत्तरेकडे आणि नंतर उत्तर इशान्येकडे वळेल. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या जवळ हे वादळ ३ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्यानं त्यांच्या दैनंदिन बुलेटिनमध्ये अरबी समुद्रात दोन वादळ तयार होत असल्याचं सांगितलं आहे. यातील एक आफ्रिकन किनाऱ्यापासून ओमान यमनच्या दिशेने जाईल तर दुसरं वादळ भारताजवळ सज्ज आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्राच्या आग्नेय-पूर्व-मध्य-प्रदेशात येत्या 48 तासांत कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. पुढील ४८ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करीत हे वादळ जूनपर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळेल.

अतिवृष्टीची भीती
राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राचे प्रमुख सती देवी यांनी सांगितलं की, 4 जूनसाठी किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा आणि संपूर्ण गुजरातसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या वादळामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावरील महाराष्ट्र आणि गोव्यासाठी रेड अलर्ट आणि गुजरातसाठी ऑरेंज अलर्ट 3 जूनसाठी जारी करण्यात आला आहे.

आयएमडीने ट्विट केलं आहे की, दक्षिणपूर्व व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्र व लक्षद्वीप या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासांच्या दरम्यान, तो पूर्व-मध्य आणि लगतच्या आग्नेय अरब अरबी समुद्रात बदल दिसेल आणि पुढील 24 तासांत ते चक्रीवादळ बनेल.

 

News English Summary: The summer mercury had been rising for the past few days, so the citizens were greatly annoyed by Ukada. However, the first rains that fell in Mumbai at midnight yesterday have made the people of Mumbai happy. But the Indian Meteorological Department has forecast a cyclone on the west coast.

News English Title: Heavy rain is expected in Mumbai on June 3 and 4 says News latest Updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x