29 April 2024 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

'एक देश, एक निवडणूक' अशक्य: मुख्य निवडणूक आयुक्त

नागपूर : काही महिन्यापासून वन नेशन वन ईलेक्शन’वर चर्चा रंगली असताना स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसे करायचे झाल्यास आधी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल तसेच ईव्हीएम’च्या दुप्पट म्हणजे तब्बल ४५ लाख मतदान यंत्र लागतील असं सांगत ‘एक देश, एक निवडणूक’ शक्य नसल्याचं कारण दिल आहे.

ओमप्रकाश रावत हे एका कार्यक्रमानिमित्त नागपूरला आले असताना मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सद्यस्थितीत निवडणूक आयोगाला १५-१६ लाख यंत्र लागतात. परंतु आगामी निवडणुकीसाठी ४५ लाख यंत्र लागतील असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्राची ऑर्डर देण्यात दिली आहे. निवडणूक आयोगाकडे ते सप्टेंबर अखेरपर्यंत मतदान यंत्रे येतील तर नोव्हेंबरपर्यंत व्हीव्हीपॅट तयार होतील अशी माहिती दिली.

ईव्हीएमच्या विरोधात देशभरातील १७ पक्ष एकत्र आले आहेत,याकडे लक्ष वेधले असता रावत म्हणाले, अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा विविध पक्षाच्या गटाने आयोगाला वेळ मागितली नाही. मात्र, त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यास निश्चित वेळ देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल असा खुलासा त्यांनी केला आणि निवडणूक आयोग सर्वांसाठी खुले आहे असं प्रतिपादन सुद्धा त्यांनी केलं.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x