11 December 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

आजचा भारत बंद सरकार पुरस्कृत; मनसेचा धक्कादायक आरोप

MNS Sandeep Deshpande, Maharashtra Bandh

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी (NRC) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे. या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे.

बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदवरून मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. बंद हा सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे.

आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता होती.

अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील बंद हे सरकार पुरस्कृत आहे. राज्य सरकारच बंद पुकारत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भारत बंदबाबत नेमकं तेच घडत आहे, असंही ते म्हणाले.

नागरिकत्व सुधारित  कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या दोन वेगळ्या गोष्टी आहे. मनसेचा सीएए कायद्याला विरोध असून एनआरसी कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आधीही आपल्या भाषणातून भारतात असलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना हकलून द्या असा उल्लेख केला होता असं देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title:  MNS leader Sandeep Deshpande has alleged todays Maharashtra Bandh Government sponsored.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x