महत्वाच्या बातम्या
-
आमदार खरेदी-विक्री लवकरच मध्य प्रदेशात देखील होणार? लोकशाही विकत घेतली जाते आहे?
मतदाराने एखाद्या अमुक पक्षाला मतदान केले आणि निवडून आलेल्या आमदाराने स्वतःच विकून एकप्रकारे मतदाराच्या मताला विकून स्वतःच्या खिशात बक्कळ पैसा कोंबणे असाच होतो. एकीकडे भाजपने पैशाच्या बळावर लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा सपाटाच लावला असून काँग्रेस देखील हतबल असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ कर्नाटक राज्यात दाखल होताच, मध्य प्रदेशात आर्थिक बळावर हालचाली सुरु झाल्याचं म्हंटल जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराज फेम अमोल कोल्हे यांच्या भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली दाद
शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना पराभूत करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या शिरूर मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी फेम अमोल कोल्हे यांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींनी त्याच्या लोकसभेतील पहिल्या आकर्षित भाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
९१ हजार कोटींच्या घोटाळ्यातील कंपनीवर फडणवीस सरकार मेहेरबान का? धनंजय मुंडेंचा सवाल
महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुका, जिल्हा आणि ग्रामपंचायत हे “महानेट” प्रकल्पाअंतर्गत इंटरनेट शिवाय वायफायने जोडणे हा प्रकल्प नुकताच महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पातील सर्व तांत्रिक बाबींचं ऑडिट करण्यासाठी ५ सल्लागार समित्या नेमण्यात आल्या आहेत. याच ५ कंपन्यांपैकी १ आहे “डेलॉइट”.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला?
लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने वायएसआर काँग्रेस या आंध्र प्रदेशातील पक्षाला ऑफर दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी आधीच दावा केला होता आणि हा आमचा नैसर्गिक अधिकार असल्याचं म्हटलं होत. परंतु, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली आणि हा प्रस्ताव ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत खात्रीलायक वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा, ममता-मोदी वर्ड वॉर
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीतील ‘वर्ड वॉर’ जरा जास्तच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक काही थांबता थांबेना. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ममता म्हणाल्या म्हणाल्या, ‘मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहेत’. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असंही त्या पुढे म्हणाल्या.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी नवऱ्याचं कमी, माझ्याच नावाचा जास्त जप करतायत : स्मृती इराणी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांना मागील ५ वर्षात माझं नाव माहिती नव्हतं.परंतु, आता ते सातत्याने माझ्या नावाचा जप करीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींना टोला लगावला आहे. अमेठीत प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या.
6 वर्षांपूर्वी -
गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दिल्लीतील भाजपचे उमेदवार गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतम गंभीरच्या विरोधात दुसरी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. गौतम गंभीरच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनतर त्यांच्यावर परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या लोकांना भाजप सरकार त्रास देत आहे? मनसेचा आरोप
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सभा महाराष्ट्रभर नाही तर देशभर गाजत आहेत. एक वेगळ्याच प्रकारे व्हिडिओ प्रेझेंटेशन देऊन राज ठाकरे सध्या भाजप सरकार तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल करत आहेत. या पोलखोल दरम्यान राज ठाकरेंनी बरेचसे व्हिडिओ दाखवले आहेत आणि या व्हिडिओ मधून बरेचसे चेहरे महाराष्ट्राला नव्याने कळले.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या सभेत सापांची भीती, कांद्याचा पाऊस नाही पडला म्हणजे मिळवलं
नाशिक: आज दिनांक २२ एप्रिल रोजी नरेंद्र मोदींची दिंडोरी नाशिक येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा आहे. मोदींची सभा ज्या मैदानावर होणार आहे ते मैदान ६०० एकरवर पसरलेले आहे. संपूर्ण मैदान जरी सभेसाठी वापरले जाणार नसले तरी मैदानाचा बराचसा भाग मात्र वापरला जाणार आहे. या मैदानाची पुरेपूर स्वच्छता करण्यात येईल अशी माहिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
काय उखडायची ती उखडा! शरद पवारांचे अमित शहांना आक्रमक उत्तर
बारामती येथील सभेत शरद पवार म्हणाले, मला पद्मविभूषण देणारे, माझं बोट धरून राजकारणात आलोय असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनी काय केले म्हणून विचारतात हे हस्यास्पद आहे. हे सरकार सैन्याच्या शौर्याचे श्रेय स्वत: घेत आहेत. अभिनंदनची सुटका माझ्यामुळे झाली असं सांगत पंतप्रधान मोदी ५६ इंचाची छाती दाखवतात पण मग आपला कुलभूषण जाधव कित्येक वर्ष पाकिस्तानात का आहे. त्याला सोडवताना मात्र याच पंतप्रधानांची छाती एकदम १२ इंचाची कशी काय होते?
6 वर्षांपूर्वी -
हाफीज सईद तर संत वाटत असेल तुम्हाला? स्वरा भास्कर
भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा असा थेट सामना रंगणार आहे. परंतु मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी यांना उमेदवारी दिल्याबद्दल अनेकांकडून टीका होत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वरा भास्करनेही उडी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
२६/११ तील दहशदवाद्यांचे आभार? करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान त्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबलं तरी मत भाजपला - प्रकाश आंबेडकरांचा आरोप
सोलापूर: सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १० लोकसभा मतदारसंघांसाठी मतदार प्रक्रिया सुरु आहे. याच निवडणूक प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्रात कित्तेक ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान नोंदवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली म्हणून आयएएस अधिकारी निलंबित
भुवनेश्वर: दिनांक १६ एप्रिल २०१९ रोजी ओडिसा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांना निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले आहे. मंगळवारी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संबलपूर लोकसभा मतदारसंघात सभेसाठी आले होते त्यावेळेस त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी मोहम्मद मोहसिन आणि त्यांच्या टीमने केली होती.
6 वर्षांपूर्वी -
विनोद तावडेंचे राज ठाकरेंना चॅलेंज, 'कट-पेस्ट' चं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी
मुंबई: साऱ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील मराठी माणसांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या राज ठाकरेंना विनोद तावडेंनी खास टोला लगावला आहे. विनोद तावडेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत ‘कट-पेस्ट’ चं राजकारण सोडून काहीतरी ठोस भूमिका घ्या असं म्हटलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले राज ठाकरेंनी त्यांचा माणूस आमच्या सोबत पाठवावा मग आम्ही त्यांना गावाची दुसरी बाजू दाखवू.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा राज ठाकरे आठवतील? मराठी युवकांच्या रोजगाराचा व मुंबईचा स्मार्ट गेम 'गिफ्ट'मार्गे होणार?
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनी वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात रोजगारासारखे महत्वाचे मुद्दे मोदींच्या भाषणातून लुप्त झाले आहेत आणि त्याची जागा हिंदुत्व आणि भारतीय लष्कराच्या शौर्याने घेतली आहे. देशात २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आमिष देशातील तरुणांना दाखवत प्रत्यक्षात ५ कोटीच्यावर तरुण देशभरात बेरोजगार केले गेले. केंद्र सरकारला त्याचं काहीच सोयर सुतक नाही अशीच एकूण परिस्थिती आहे. समाज माध्यमाच्या विकृतीतून अनेक तरुणांचे मेंदू धर्म आणि भारतीय लष्कराच्या शौर्याभोवती असे काही गोंगावात ठेवले आहेत की त्या ‘फेसबुक’ वरील फ्री नेटपॅकने आपल्याला कधीच बेरोजगार केलं आहे याची कल्पना देखील तरुणांना राहिलेली नाही.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
6 वर्षांपूर्वी -
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
6 वर्षांपूर्वी -
बाजार थांबेना; गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन
गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकूण तीन आमदार आहेत त्यापैकी मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांना पत्र लिहून पक्षच भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. त्यांनी रात्री पावणे दोनच्या सुमारास हे पत्र दिले आणि आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पहिला टप्पा; उमेदवारी अर्ज भरण्याची घाई आणि शक्तीप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आजच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची घाई दिसून येत आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्रीही अर्ज भरताना उपस्थित असणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL