महत्वाच्या बातम्या
-
देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर मुंबई, पुण्यातील नागरिकांनी गावची वाट धरली. मिळेल त्या वाहनाने तसेच शेकडो किमी पायपीट करत नागरिक गावागावात पोहोचले. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ४५ हजारहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. तर काहींना प्रवासात प्राण गमवावे लागले. जिल्ह्यात एकूण १७ करोनाबाधित रुग्णांपैकी ७ रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून सध्या १० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज
लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का, बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. औंध रावेत उड्डाणपूलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू
पुणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच दरम्यान हडपसर भागातील प्रसिद्ध डेअरी मालकासह ११ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
देशातील चौथ्या टप्प्याचा लॉकडाउन येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे ३१ मे नंतर यासंदर्भात कोणता निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अशातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाउन आणखी १५ दिवसांनी वाढवावा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे .
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महत्वाची बैठक; १ जूनपुढील योजना?
आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण आणि कॉरेंटाईन सुविधा या बाबींची जबाबदारी असलेल्या केंद्र सरकारच्या पॅनलने मोदी सरकारला लॉकडाऊनबाबत काही शिफारशी केल्या आहेत. यापुढे लॉकडाऊन वाढवण्यात येऊ नये, अशी शिफारस केल्याचं वृत्त ईटीने दिलं आहे. लॉकडाऊन ४ हे ३१ मे रोजी संपणार आहे. पण त्यानंतर काय असा प्रश्न पडलेला असतानाच या पॅनलने सरकारसमोर एक्झिट प्लॅन सादर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला सुनावले
स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटीप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. मात्र स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासासाठी राज्यांनीच खर्च केल्याचं खुद्द केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीच सर्वोच्च न्यायालयाला सांगतिलं आहे. आणि तुषार मेहता यांच्या या युक्तीवादाचा हवाला देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही महाराष्ट्र भाजपवर जोरदार टीका केलीय.
5 वर्षांपूर्वी -
आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना TV आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे
कोरोना चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र लॉकडाऊन शिथिल केला तर संसर्गाची भिती अधिक आहे, आणि लॉकडाऊन असाच जारी केला तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत होणार आहे. यात शाळेतील विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत १८१ पोलिस कोरोनाबाधित; तर ३ पोलिसांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १८१ पोलीस करोनाबाधित झाले आहेत. तर ३ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २ हजार २११ पोलीस करोनाबाधित झाले आहेत तर यात २४९ पोलीस अधिकारी आणि १ हजार ९६२ पोलीस कर्मचारी करोना संक्रमित आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदींशी संपर्कच झालेला नसताना ट्रम्प म्हणाले ‘मोदींचा मुड ठिक नाही’?
भारत-चीन सीमावाद प्रश्नावर अमेरिका मध्यस्थी करु इच्छित आहे. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. मात्र भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला असून दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही बातचीत झाली नसल्याचे सांगितले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ४ एप्रिल रोजी शेवटचा संपर्क झाला होता, असे दिल्लीतील सुत्रांनी माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत मुंबईतील ९९% ICU बेड्स व्यापलेले; आता पुढे काय?
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केवळ रुग्णांच्या वाढीचं नाही तर रुग्णालयाचंही मोठं संकट आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, त्यांची सोय करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे विशेष सोय नसल्याचं दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील ९९% अतिदक्षता विभागातील बेड (ICU Beds) आणि ७२% व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. जी रुग्णालयं कोव्हिड-१९च्या गंभीर रुग्णांवर उपचार करत आहेत ती देखील ९६ टक्के भरले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारत चीनच्याही पुढे गेला
चीनपासून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरस संसर्गाचा परिणाम भारतात वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७४६६ नवीन रुग्ण आढळले. कोरोनाची नवीन प्रकरणं अस्तित्त्वात आल्याने देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून १,६५,७९९ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केरळमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण वाढले, मान्सूनसोबत कोरोनाची दुसरी लाट?
केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागच्या एका आठवडयात केरळमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अफवांवर विश्वास ठेऊ नका, मुंबईला टोळधाडीचा धोका नाही - एलडब्लूओ
कोरोना, अफ्मान चक्रीवादळा पाठोपाठ आता टोळ कीटकाचा धोका देशातील नागरिकांपुढे उभा ठाकला आहे. तर टोळधाडीचं संकट आता मुंबईत देखील आलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक फोटो आणि व्हिडिओमुळे मुंबईत टोळ दिसून आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत असलेल्या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (एलडब्लूओ) मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रिअल इस्टेट सेक्टर पूर्ण बिघडण्याच्या स्थितीत, पवारांचं पंतप्रधानांना पत्र
लॉकडाउनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच झळ बसली आहे. अनेक क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम झाला असून, सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कामगार कपातही सुरू केली आहे. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रालाही लॉकडाउनचा फटका बसला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष देण्याची विनंती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
युपी सरकारचा यु-टर्न, मायग्रेशन कमिशनमध्ये ती अट समाविष्ट करणार नाही
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमावली तयार करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. या पुढे कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामागांराच्या सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल.
5 वर्षांपूर्वी -
धारावीत परिस्थिती सुधारत असताना गावाला जाण्यासाठी धारावीतील मजुरांची रस्त्यावर गर्दी
कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील रस्त्यांवर आज गावाला जाण्यासाठी हजारो मजूर कुटुंबीयासह सामान घेऊन आले होते. श्रमिक रेल्वेतून जाण्यासाठी हे मजूर स्टेशनपर्यंत जाणाऱ्या बसची सकाळपासून वाट पाहत होते. यादरम्यान धारावीच्या रस्त्यावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे समजताच पोलिसांनी तेथे येऊन या मजुरांना रांगेत उभे केले.
5 वर्षांपूर्वी -
उपचाराविना बाळाने वडिलांच्या कुशीत प्राण सोडले; यूपीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा
ग्रेटर नोएडातील सेक्टर ३६ मध्ये राहणारे राजकुमार यांच्या मुलाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. मात्र रुग्णालयात सगळीकडे धावाधाव करूनही ते आपल्या मुलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. राजकुमार यांनी सांगितले की, ते एका खासगी कंपनीत काम करतात. येथील एका रुग्णालयात त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे जोरदार ऑनलाईन आंदोलन, ५० लाख कार्यकर्त्यांचा सहभाग
भाजपाच्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ३० मे रोजी भाजप देशभर १००० व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सेस व ७५० व्हर्च्युअल रॅलीज घेणार आहे. त्यापूर्वीच दोन दिवस अगोदर काँग्रेसने त्यांच्या १३५ वर्षांच्या इतिहासातील पहिलेच ऑनलाईन आंदोलन केले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना परिणाम: बोईंग कंपनी १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार
अमेरिकेमध्ये कोरोना महामारीमुळे उद्योगावर मोठा परिणाम झाल्याने अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. अशा परिस्थितीत विमानची निर्मिती करणाऱ्या बोईंग या कंपनीनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून अमेरिकेतील १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. तसेच या १२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार ५२० कर्मचाऱ्यांना बोईंग स्वेच्छानिवृत्ती देणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लक्षणं आढळल्याने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात दाखल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पात्रा यांच्या शरीरात कोविड १९ ची लक्षणे दिसल्यानेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे वृत्त आहे. पात्रा हे भाजपा प्रवक्त्यांच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असून ते सातत्याने न्यूज चॅनेवरील चर्चासत्रात पक्षाची बाजू मांडत असतात.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL