महत्वाच्या बातम्या
-
पुन्हा वाद! मंत्री एकनाथ शिंदेबाबत काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार
महाविकास आघाडीतील कुरबुरी कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. एक मिटल्यावर दुसरा वाद उफाळून येतं असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाही, तसेच त्यांच्या महत्वपूर्ण कामाच्या फाईल्स अडवून ठेवत असल्याबद्दल चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी उघडपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजी बोलून दाखविल्याने, आघाडीतील बेबनाव पून्हा समोर आला आहे. शिवसेना मंत्र्यांना समज द्यावी व कॉग्रेसच्या आमदारांचा सन्मान करावा अशी मागणी केल्याने आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची बाब समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी अशा धार्मिक कार्यक्रमांपासून दूर राहावं
अयोध्येत राम मंदिर उभारण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी ५ ऑगस्टला भूमिपूजन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मंदिर बांधकाम पायाभरणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील अशी माहिती असली तरी त्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नं पाहावीत - गुलाबराव पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्यापासून महाराष्ट्रातील सरकार सुद्धा पडणार अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. मात्र स्वतः फडणवीसांनी देखील आम्हाला सरकार पाडण्यात काहीच रस नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर देखील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींकडून प्रतिकिया येतंच आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या १०५ पैकी काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात - यशोमती ठाकूर
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळ सर्वत्र चर्च आहे. त्यात महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं असून उलटपक्षी भाजपचे १०५ पैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीत महाजॉब्स योजनेवरून पुन्हा ठिणगी...काँग्रेसकडून प्रश्न
महाविकासआघाडीत पुन्हा एकदा काँग्रेसने नाराज आहे. काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वीच महाजॉब्स ही योजना सुरु झाली. पण या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. यावरुन काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
यूजीसीविरोधात विद्यार्थ्यांचं ई-मेल आंदोलन, तर परीक्षा न घेण्याचा निर्णयावर राज्य सरकार ठाम
महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. पण, यूजीसीने अंतिम वर्षाची सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बीडमध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी समोर येऊन उघडपणे यूजीसीच्या निर्णयाविरोधात अनोखे आंदोलन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुढील ३ महिने शिवभोजन थाळी १० वरुन ५ रुपयांवर, मंत्रिमंडळ बैठकीतील ९ निर्णय
महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. (Maharashtra cabinet Decisions) कोरोना आणि अनलॉकिंगच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 9 निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे आणखी तीन महिने शिवभोजन थाळीची किंमत 10रुपयांवरुन 5 रुपयांवर करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी अवघ्या 5 रुपयांत मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
लागा तयारीला, महाविकास आघाडी सरकारचा १० हजार पोलीस शिपाई भरतीचा निर्णय
अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपल्यानंतर अजित पवार मातोश्रीवर दाखल
राज्यात २ जुलैला झालेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चर्चा झाली. या चर्चेत गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. मात्र या बैठकीत नक्की काय निर्णय झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आज मातोश्रीवर जवळपास ४५ मिनिटे यावर चर्चा झाली.
5 वर्षांपूर्वी -
फक्त गोंधळ! महास्वयंम रोजगार पोर्टल असताना अजून 'महाजॉब्स' पोर्टल लाँच
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीतील कुरबुरींबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं वृत्त होतं. आज संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. महाविकासआघाडीतल्या नाराजीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. तसंच लॉकडाऊनबाबतही दोघांमध्ये संवाद होईल अशी माहिती पुढे आली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना समूह संसर्गाबाबत मंत्र्यांमध्ये गोंधळ, एक म्हणाल्या आहे, दुसरे म्हणतात नाही
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून ७ हजार ३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
लॉक-अनलॉक'मुळे महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज
महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉकडाऊन वाढवल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य सुरू झालं आहे. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
व्यवस्थित माहिती मिळवून अग्रलेख लिखाण असावं - बाळासाहेब थोरात
‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा - आ. राम कदम
‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेत नाहीत - सामना
राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते? मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेत नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये, असे शिवसेनेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीत काँग्रेसच्या कुरघोड्या सुरु, अंतर्गत वाद वाढले
सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिसरा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने प्रथमच आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. गेले दोन दिवस काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठका सुरू असून आज माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नाराजीला तोंड फोडले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल